नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराजांवर बोलणारा वाचाळ वीर लक्ष्मण हाके याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.


हे निवेदन सुशील कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी (Deputy Superintendent of Police), यांना देण्यात आले. यावेळी उपस्थितांनी लक्ष्मण हाके यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर त्वरित कारवाई करण्याची विनंती केली. सुशील कुमार नायक साहेब यांनी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.


यावेळी माधवराव पाटील, तिरुपती पाटील, मंगेश पाटील, सदा पाटील, अनिल पाटील, अजिंक्य पाटील, गोविंद पाटील आनंद पाटील, संदीप पाटील, पांडुरंग पाटील हे होते.
