उस्माननगर| दैनिक लोकनेताचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी तथा उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे सभासद आणि न्यूनगंड बाजूला ठेवून पत्रकार क्षेत्रात कार्यरत असलेले बाजीराव पाटील कळकेकर यांची पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असणाऱ्या लोकशाही पत्रकार संघाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड सं. अ. बीबी वैद्य यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव, मराठवाडा अध्यक्ष प्रभाकर पांडे, यांनी सदरील निवड करण्यात आली आहे.
पत्रकार दैनिक लोकनेता वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी बाजीराव पाटील कळकेकर हे अनेक वर्षांपासून विविध वर्तमानपत्रांमध्ये काम केले आहे . सामाजिक भावनेतून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी दैनिक लोकनेता मधून प्रश्न मांडून न्याय देण्याचे कार्य करत असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटना घडामोडी वर बारकाईने व अभ्यासपूर्वक लक्ष देऊन बातमी संकलन करतात. जिल्ह्यात व ग्रामीण भागात बाजीराव पाटील कळकेकर यांचा वाढता मित्र परिवार असून सर्वांसोबत पत्रकार म्हणून न वावरता दोस्त म्हणून मिळून राहतात. जिल्ह्यात पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या समाज कार्याची दखल लोकशाही पत्रकार संघाच्या वरीष्ठ पदाधिकारी यांनी दखल घेऊन मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार, डॉक्टर, शिक्षक, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे