HomeनांदेडDrm Niti sarkar ; स्वच्छ भारताचा प्रवास आपल्यापासून सुरू होतो! - श्रीमती...

Drm Niti sarkar ; स्वच्छ भारताचा प्रवास आपल्यापासून सुरू होतो! – श्रीमती नीति सरकार -NNL

नांदेड। भारतीय रेल्वे मध्ये ‘स्वच्छता ही सेवा 2024’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत दिनांक 21/09/2024 रोजी, श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस मधील प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांना स्वच्छता राखण्यासाठी रेल्वेला मदत करण्याचे आवाहन केले.

संवादा दरम्यान त्यांनी प्रवाशांना सांगितले कि ‘स्वच्छ भारताचा प्रवास आपल्यापासून सुरू होतो. तसेच या गाडीमध्ये स्वच्छता ठेवणाऱ्या कर्मचार्यांशी हि संवाद साधला, स्वच्छता राखण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी नोंद घेतली आणि त्यांना आणखी सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहित केले.

यानंतर श्रीमती सरकार यांनी नांदेड रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेची पाहणी केली आणि संबंधित अधिकार्यांना यात सुधारणा करण्याचे आदेशित केले. या प्रसंगी रामचंद्र साहू, वरिष्ठ विभागीय पर्यावरण व्यवस्थापक, नांदेड, श्रीनिवास सूर्यवंशी , सहायक वाणिज्य अधिकारी , नांदेड आणि इतर रेल्वे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments