हिंगोली l मागील दहा दिवसापासून टिळक स्मारक मैदान पंढरपूर येथे दि.१८ सप्टेंबर रोजी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण अंमलबजावणी करिता संपूर्ण महाराष्ट्रातील ६ मल्हार योद्धे सोलापूर येथील माऊली हळवनार जालना येथील दीपक बोराडे बीड येथील यशवंत गायके सातारा येथील गणेश केसकर पुणे येथील योग्य धरम अहिल्यादेवी नगर मधून विजय तमनर हे सर्व आमरण उपोषणाला बसले आहेत.
त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळमनुरी विधानसभेचे नेते डॉक्टर रमेश मस्के नाईक यांनी त्यांची भेट
घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी डॉक्टर रमेश मस्के म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजपा सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देणार होते परंतु आज दहा वर्षे पूर्ण झाली तरी त्यांनी धनगर समाजाला केवळ फसवण्याचे काम केले आहे परंतु यापुढे ही फसवणूक सरकारला निवडणुकीत हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही येत्या काही काळामध्ये धनगर समाजाची शिष्टमंडळ उद्धव साहेब ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना भेटणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ रमेश मस्के नाईक यांनी सांगितले .