Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

emerge from the children’s camp : हिमायतनगर येथील बालसंस्कार शिबिरातून भावी पिढी उदयास येईल -NNL

emerge from the children’s camp : हिमायतनगर येथील बालसंस्कार शिबिरातून भावी पिढी उदयास येईल -NNL

करियर, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| तन-मन, धन से सदा सुखी हो भारत देश हमारा या उद्देशाला साध्य करण्यासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमीत्त बाल सुसंस्कार शिबीर सप्ताहांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात भजन, किर्तन सामुदायिक ध्यान, प्राणायाम, योग्य, बौद्धिक सत्र यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. आज रविवारी शहरातील मुख्य रस्त्याने रामधून रैली काढून बाल सुसंस्कार शिबिराचा समारोप करण्यात आला आहे. बाल वयातच मुलांवर योग्य संस्कार व्हावेत यासाठी बालसंस्कार शिबीर घेण्यात आले असून, विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न बनविणे, त्यांचे आत्मबल मनोबल वाढवून, आई-वडील, शिक्षक, अतिथी तसेच देश आदी विषयक आदर निर्माण करणे, मूल्यशिक्षणातुन संस्कार, नैतिकता व चारित्र्याचे संवर्धन करणे हे महत्वपूर्ण कार्य गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मागील पाच वर्षांपासून बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून सु...
Voting awareness : चिमुकल्यांची पथनाट्याद्वारे जवळ्यात मतदानजागृती -NNL

Voting awareness : चिमुकल्यांची पथनाट्याद्वारे जवळ्यात मतदानजागृती -NNL

करियर, नांदेड
नांदेड| २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध शाळा महाविद्यालयांतून तसेच स्विपद्वारे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या कामी जवळा दे. येथील काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन पथनाट्याचे उत्तम सादरीकरण केले. घरातच बसता का गं तुम्ही, मतदान करु या साऱ्या जणी...बाई बाहेर ये गे मत देऊन ये अशा प्रकारे गीतांच्या माध्यमातून पथनाट्याद्वारे जवळ्यात मतदानजागृती करण्यात आले. चिमुकल्यानी पथनाट्याद्वारे गावकऱ्यांचे लक्ष वेधले. लेखक गंगाधर ढवळे यांनी लिहिलेल्या पटकथेवरुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा दे. येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष घटकार, हैदर शेख यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थ...
Hanmant Narayan Kandaharkar ; सिनेट सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य हणमंत नारायण कंधारकर यांना पीएच.डी. प्रदान – NNL

Hanmant Narayan Kandaharkar ; सिनेट सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य हणमंत नारायण कंधारकर यांना पीएच.डी. प्रदान – NNL

नांदेड, करियर
 नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य आणि सामाजिकशास्त्रे संकुलातील संशोधक विध्यार्थी हणमंत नारायण कंधारकर यांना पीएच. डी. प्रदान करण्यात आली आहे. यांनी समाजकार्य या विषयात डॉ.घनश्याम येळणे यांच्या मार्गदर्शनाखाली 'मराठवाड्यातील बालगृहातील बालकांच्या हक्क व संवर्धनामध्ये बालगृहांची भूमिका' या विषयावर संशोधन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठतील कुलगुरू डॉ.मनोहर चासकर , व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण, मा.कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.साबळे,अंतरविद्यशाखा अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर सर, विज्ञान अधिष्ठाता डॉ.म.के.पाटील, उप कुलसचिव डॉ.रवि एन.सरोदे , जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ.जि.एस.येळणे, संकुलातील प्रा.डॉ.बी.एस.जा...
Chhatrapati Sambhajinagar ; छत्रपती संभाजीनगर ट्रायथलॉन संघटनेतर्फे डॉ. देशमुख, डॉ. जटाळे यांचा सत्कार…! – NNL

Chhatrapati Sambhajinagar ; छत्रपती संभाजीनगर ट्रायथलॉन संघटनेतर्फे डॉ. देशमुख, डॉ. जटाळे यांचा सत्कार…! – NNL

नांदेड, करियर, छत्रपती संभाजीनगर
नांदेड l नांदेड येथे नुकत्याच झालेल्या डॉक्टरांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत डॉ. प्रफुल्ल जटाळे आणि डॉ. सुनील देशमुख यांनी जबरदस्त कामगिरी करताना पदकांची लूट केली. डॉ. सुनील देशमुख यांनी जलतरणात २ सुवर्ण, ३ रौप्य व सायकलिंगमध्ये एक अशा पाच पदकांची कमाई केली. तसेच डॉ. प्रफुल्ल जटाळे यांनी सायकलिंगमध्ये ५० कि. मी. रेसमध्ये आणि मॅरेथॉनमध्ये अशा एकूण दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. तसेच जलतरणात एक रौप्य व एक कांस्य पदक पटकावले. या दोघांना अभय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राज्य क्रीडा स्पर्धेत पदकांची लूट केल्याबद्दल जटाळे व देशमुख यांचा मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मडलेचा, सुंदरबाबू सोरोसिया, रुस्तुम तुपे, ट्रायथलॉनचे आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी अभय देशमुख यांच्या उपस्थितीत मनपाच्या स्विमिंग पूल येथे नुकताच सत्कार करण्यात आला. नांदेड येथे झालेल्या डॉक्टरांच्या राज्यस्तरीय क्र...
Pani film fame actress Madhuri Lokre : मुलींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाऊ द्या – पाणी चित्रपट फेम अभिनेत्री माधुरी लोकरे -NNL

Pani film fame actress Madhuri Lokre : मुलींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाऊ द्या – पाणी चित्रपट फेम अभिनेत्री माधुरी लोकरे -NNL

करियर, नांदेड
नांदेड| आपल्या मुला मुलींचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे पाहूनच त्यांना पालकांनी आपले क्षेत्र निवडू द्यावे. प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध होत असतात. पालकांनी आपल्या अपेक्षा, इच्छा किंवा आकांक्षा त्यांच्यावर लादू नयेत. विशेषतः मुलींना अधिक बंधनं घातली जातात. परंतु अभिनय क्षेत्रात मी माझ्या वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच माझे करिअर करु शकले. म्हणूनच मुलींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाऊ द्या असा सल्ला पाणी चित्रपट फेम अभिनेत्री माधुरी लोकरे यांनी दिला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी पंडित पाटील बेरळीकर, प्रमुख पाहुणे म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक कवी अनुरत्न वाघमारे, कवी प्रल्हाद घोरबांड, राजेश लोकरे, मीनाक्षी कोकुलवार, संयोजक तथा आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलचे संचालक कवी पांडुरंग कोकुलवार, निमंत्रक प्रज्ञाधर ढवळे आदींची उपस्थिती होती. येथील आकाश प्...
Sanjay Jadhav ; संजय जाधव यांच्या कडे उपायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार – NNL

Sanjay Jadhav ; संजय जाधव यांच्या कडे उपायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार – NNL

नांदेड, करियर
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड वजिराबादचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्या कडे मनपा आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे यांनी एका आदेशाव्दारे अतिरिक्त उपायुक्त पदाचा पदभार दिला आहे. महानगर पालिका अधिनियमातील‌कलम 49अवन्ये संजय नारायण जाधव सहाय्यक आयुक्त वजिराबाद क्षेत्रीय कार्यालय यांच्या कडे मुळ काम सांभाळून अतिरिक्त उपायुक्त पदाचा पदभार मनपा आयुक्त यांनी 6 नोव्हेंबर रोजी काढलेल्या एका आदेशाव्दारे काढला असुन यात घनकचरा व्यवस्थापन स्वच्छता विभाग, स्वच्छ महाराष्ट्र अभियान , भांडार विभाग,भुसंपादन‌ विभाग, वाचनालय विभाग, स्थानिक कर विभाग,दिव्याग कल्याण कक्ष,कोंडवाडा विभाग, आदि विभागाच्या अतिरिक्त पदभार दिला आहे. मनपा नांदेड येथे विविध विभागांतील केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोद‌ घेऊन मनपा आयुक्त यांनी उपायुक्त पदाचा पदभार दिला आहे,ऊद्या 8 नोव्हेंबर रोजी ते पदभार स्वीकारनार आहेत....
My opinion is my right : ‘माझे मत माझा अधिकार’ तो मी बजावणारच; नवमतदार शासकीय मागासवर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थिनींचा संकल्प -NNL

My opinion is my right : ‘माझे मत माझा अधिकार’ तो मी बजावणारच; नवमतदार शासकीय मागासवर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थिनींचा संकल्प -NNL

नांदेड, करियर
भोकर| भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकास मतदानाचा हक्क-अधिकार प्रदान केला आहे. निसंदेह 'माझे मत माझा अधिकार' आहे तो लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी बजावणारच असा संकल्प शासकीय मागासवर्गीय वस्तीगृहातील नवमतदार विद्यार्थिनींनकडून कऱण्यात आला आहे. ८५- भोकर विधानसभा मतदार संघात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत विशेष कार्यक्रम घेऊन, नवमतदार मुलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे, स्वीप कक्ष प्रमुख सुमन गोणारकर, वस्तीगृह अधिक्षिका सौ सुमित्रा साळुंके,आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले. यास नव मतदार विद्यार्थिनींनी मोठा प्रतिसाद देत...
Mahendra bhole ; स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सातत्य आवश्यक – विक्रीकर निरीक्षक महेंद्र भोळे -NNL

Mahendra bhole ; स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सातत्य आवश्यक – विक्रीकर निरीक्षक महेंद्र भोळे -NNL

करियर, नांदेड
लोहा। स्पर्धा परीक्षेत नियमित अभ्यास केला पाहिजे जाहिरात आले की अभ्यास केला तर आपला रिझर्ट येईलच याची शक्यता कमी असते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळविण्यासाठी सातत्य असले पाहिजे अपयशाने खचून जाऊ नये नियमित अभ्यास करावा असे ऑनलाइन मार्गदर्शन झुम।द्वारे विक्रीकर निरीक्षक महेंद्र भोळे यांनी केले. लोहा शहरातील जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्रात ऑनलाइन झुम द्वारे विक्रीकर निरीक्षक महेंद्र भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना संचालक हरिहर धुतमल पत्रकार गोविंद कदम बेनाळकर , इमाम लदाफ, बालाजी ढवळे यांची उपस्थिती होती महेंद्र यांनी अतिशय कष्टाने शिक्षण घेतले .तलाठी नौकरी सोडून दिली व स्पर्धा परिक्षा अभ्यास सुरूच ठेवला त्याच्या पत्नी किरण यांची गंभीर साथ मिळाली .आई कमलबाई वडील लक्ष्मणराव याचे प्रेरणा मिळाली. ऑनलाईन मार्गदर्शन करताना विक्रीकर निरीक्...
Rupesh Padmukh ; संपादक रुपेश पाडमुख यांना मुंबईचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर -NNL

Rupesh Padmukh ; संपादक रुपेश पाडमुख यांना मुंबईचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर -NNL

नांदेड, करियर
नांदेड। मागील पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत राहून पुरस्कार सोहळ्यासह विविध उपक्रम राबवणारे दै. समीक्षाचे संपादक रुपेश पाडमुख यांना मुंबई येथील आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय सुरेंद्र गावस्कर सभागृह, नायगाव, दादर (पूर्व) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. नांदेड येथे मागील पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळापासून विविध वर्तमानपत्रात सेवा देत सतरा वर्षांपासून दै. समीक्षा वृत्तपत्र काढून अन्यायाविरुद्ध वाचा फोडत वंचितचा लढा देण्यासाठी पुढाकार घेण्याचे कार्य संपादक रुपेश पाडमुख हे सातत्याने करत आहेत. एवढ्यावरच न थांबता वृत्तपत्र क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा देणार्‍यांना पुरस्कार देण्यासह शहिद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान, पोलीस दलाती...
Prajnadhar Dhawale : लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी मतदान आवश्यक – प्रज्ञाधर ढवळे -NNL

Prajnadhar Dhawale : लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी मतदान आवश्यक – प्रज्ञाधर ढवळे -NNL

नांदेड, करियर
नांदेड| निवडणूक हा लोकाशाहीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. भारतीय संविधानाने दिलेला मताधिकार निवडणुकीत वापरून लोकशाही बळकट केली पाहिजे. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी मतदान आवश्यकच असल्याचे प्रतिपादन येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. ते शहरातील खडकपुरा परिसरात 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथवाचन समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी भदंत शिलरत्न थेरो, सामाजिक कार्यकर्ते भगवान येवले, लाॅर्ड बुद्धा टीव्ही प्रतिनिधी सदाशिव गच्चे, हिरामण पंडित, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ग्रंथवाचक अनिल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उपासक प्रकाश मस्के हे होते. शहरातील वजिराबाद खडकपूरा परिसरातील भैय्यासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण सोसायटीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाचे वाचन समारोप सोहळा संपन्न झाला....
error: Content is protected !!