Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये एकता दिनानिमित्त कुलसचिव यांनी दिली शपथ – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये एकता दिनानिमित्त कुलसचिव यांनी दिली शपथ – NNL

नांदेड, करियर
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. ३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांच्या हस्ते या दोन्ही महान व्यक्तीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय संकल्प दिवस व राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली. यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह रामदास खोकले, संभाजी धनमने, बबन हिंगे, गजानन जाधव यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते....
Extension of time to apply online for 12th examination : बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ -NNL

Extension of time to apply online for 12th examination : बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 31 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. नियमित विद्यार्थ्यांची अर्ज सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पद्धतीने त्यांचे उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत. नियमित शुल्क मुदतवाढ तारखा व विलंब शुल्क तारखा तसेच शुल्क, कागदपत्रे जमा करावयाचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस/एनइएफटीद्वारे पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट बुधवार 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत जमा करावयाची आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षा...
‘Swaratim’ University Students ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात विद्यार्थ्यांनी घेतले फिल्म मेकिंगचे धडे एफटीआयआयच्या स्मार्टफोन फिल्म मेकिंग कार्यशाळेचा समारोप – NNL

‘Swaratim’ University Students ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात विद्यार्थ्यांनी घेतले फिल्म मेकिंगचे धडे एफटीआयआयच्या स्मार्टफोन फिल्म मेकिंग कार्यशाळेचा समारोप – NNL

नांदेड, करियर
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि भारत पातळीवरील नामांकित भारतीय फिल्म व टेलीव्हिजन संस्था (एफटीआयआय) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बेसिक कोर्स इन स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ या एक आठवड्याच्या कार्यशाळेचा समारोप माध्यमशास्त्र संकुलामध्ये अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. या समारोपीय सत्राला विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. रमेश ढगे, प्रा. राहुल गायकवाड यांची उपस्थिती होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते सोमवार दि. २१ रोजी या कोर्सचे उद्घाटन करण्यात आले होते. दिल्ली, ग्वालियर, मुंबई, पुणे, बिकानेर, अमरावती, सातारा इत्यादी ठिकाणावरून या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थी विद्यापीठात दाखल झाले होते....
‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात कम्प्युटर-एडेड ड्रग डिझायनिंग कार्यशाळेचा यशस्वी समारोप – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात कम्प्युटर-एडेड ड्रग डिझायनिंग कार्यशाळेचा यशस्वी समारोप – NNL

नांदेड, करियर
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये दि. २१ ते २६ ऑक्टोबर, दरम्यान पीएम-उषा योजनेअंतर्गत ‘कंप्युटर-एडेड ड्रग डिझायनिंग’ या विषयावर एक आठवडाभर चालणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस राज्यभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पदव्युत्तर, संशोधक विद्यार्थी विशेषतः छत्रपती संभाजीनगर, कराड, अमरावती, लातूर आणि नांदेड येथील संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संखेने सहभागी झाले होते. ख्यातनाम संशोधक बंगलोर, मुंबई, नागपूर, नगर आणि शिरपूर येथून मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. त्यांनी सहभागींना संगणक-विषयी औषध संशोधनातील नवीनतम तंत्रज्ञान आणि साधनांबद्दल मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. संतोष बुटले यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे स्पष्ट केली आणि औषध शोधण्याच्या प्रक्रियेत संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण यांच्या महत्त्वावर भ...
Rishikesh Bembde ; विभागीय जलतरण स्पर्धेत ऋषिकेश बेंबडे प्रथम – NNL

Rishikesh Bembde ; विभागीय जलतरण स्पर्धेत ऋषिकेश बेंबडे प्रथम – NNL

करियर, नांदेड
नांदेड | विष्णूपुरी जिल्हा परिषद हायस्कूलचा विद्यार्थी ऋषिकेश बेंबडे याने लातूर विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत ८०० मी. फ्रीस्टाईल प्रकारात विभागात प्रथम, तसेच ४०० मी. फ्रीस्टाईल प्रकारात विभागात प्रथम येऊन त्याची राज्यस्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. यानिमित्ताने शेवडी बाजीराव केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष अंबुलगेकर, जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार यांनी ऋषिकेशचा सत्कार केला. यावेळी उमाकांत बेंबडे, तेजस्विनी बेंबडे यांची उपस्थिती होती.   शहरात नुकत्याच पार पडलेल्या विविध विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेतील जलतरण स्पर्धेत ऋषिकेश बेंबडे याने नेत्रदीपक यश मिळविले. तसेच तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. राज्यस्तरीय स्पर्धा आता बालेवाडी पुणे येथे होणार आहेत. या यशाबद्दल त्याचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्य...
Importance of voting ; मतदानासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना घातले साकडे विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिले मतदानाचे महत्त्व सांगणारे संकल्पपत्र – NNL

Importance of voting ; मतदानासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना घातले साकडे विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिले मतदानाचे महत्त्व सांगणारे संकल्पपत्र – NNL

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्वीप कक्षाच्या वतीने मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम घेतले जात आहेत. नांदेड-वाघाळा महानगरपालिका वजीराबाद येथील शाळा क्रमांक 1 मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसाठी मतदान संकल्पपत्र लिहिले आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगणारे संकल्पपत्र लिहून आपल्या पालकांना दिले. त्यांना मतदान करण्याचे वचन देण्यास प्रवृत्त केले आहे. यामुळे हा उपक्रम प्रभावी ठरला आहे. याशिवाय मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरी, रॅली यासारखे उपक्रमही घेतले जात आहेत. यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपायुक्त अजितपालसिंग संधू व शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे, सर्व शिक्षक व पालकांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता....
Study Diwali of Akshar Parivar ; अक्षर परिवाराची अभ्यास दिवाळी – NNL

Study Diwali of Akshar Parivar ; अक्षर परिवाराची अभ्यास दिवाळी – NNL

नांदेड, करियर
नांदेड | दीपोत्सव अर्थात दिवाळी म्हटले की प्रत्येकाच्या आनंदाला उधाण आलेले आपण पाहतो. सर्वत्र विद्युत रोषणाई, मंद, उबदार दिव्यांची आरास घरांची शोभा वाढवत असते. तसेच घराघरात आपापल्या ऐपतीप्रमाणे निरनिराळे रुचकर, चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी असते. दीपावली सुट्ट्यांमध्ये ह्या सर्व आनंदोत्सवात कृतियुक्त, सृजनात्मक घरच्या अभ्यासाची गोड भेट देऊन अक्षर परिवार नावाने राज्यभर सुपरिचित असणाऱ्या वाजेगाव बीट ने अक्षर दिवाळी साजरी करत आपले वेगळेपण जपले आहे. या माध्यमातून बीट मधील तेराही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिली ते नववी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत दिवाळी अभ्यासाच्या कृतीपुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे.या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये अभ्यासाला पडणाऱ्या खंडाला आळा बसणार आहे.अनेकदा दिवाळी सण संपल्यावर उर्वरित सुट्ट्यांमध्ये मुलांनी करावे काय असा प्रश्न त्यांना पडत...
Rahul Sonsale ; सम्राट शाळेत विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांचा उपक्रम – NNL

Rahul Sonsale ; सम्राट शाळेत विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांचा उपक्रम – NNL

नांदेड, करियर
उस्माननगर | येथील सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत दिवाळीच्या सुट्ट्या लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक राहुल सोनसळे व सहशिक्षक सहशिक्षिका यांच्या संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला. सम्राट अशोक प्राथमिक शाळेतील पहीली ते सातवी पर्येत प्रथम सत्र परिक्षा संपल्यावर शिक्षण विभागाने दिवाळीच्या वीस दिवसांच्या सुट्ट्या जाहीर केल्या. सम्राट शाळेत विद्यार्थ्यी अध्यापन सोबतच विविध कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थी प्रथम सत्रातील परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी दिवाळीच्या सुट्ट्या मध्ये मामाच्या गावाला जातात. त्यांची भेट होत नसल्याने प्रथम सत्रातील शेवटच्या दिवशी म्हणजे दि २६ ऑक्टोबर शनिवारी दुपारी शाळेतील सहशिक्षक सहशिक्षिका यांच्या संकल्पनेतून मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी खिचडी , ,जिलेबी , समोसा , खिर , वटा...
Diwali vacation ; दिपावली सुट्टीत विद्यार्थ्याना बौद्धीक फराळाचे वाटप – NNL

Diwali vacation ; दिपावली सुट्टीत विद्यार्थ्याना बौद्धीक फराळाचे वाटप – NNL

नांदेड, करियर
नांदेड| धनगर टाकळी केंद्राअंतर्गत येणार्‍या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव (लिखा) ता. पूर्णा जि. परभणी येथे गेल्या पाच वर्षापासून दीपावली सुट्टीत बौद्धिक फराळ वाटप केला जातो. सदर उपक्रमात पायाभूत साक्षरतेची पार्श्वभूमी समाविष्ठ असलेले उतारा वाचन व त्यावरील अध्ययन निष्पत्तीवर आधारीत जसे प्रश्नोतरे, शब्दकोडी, शुद्ध शब्दाला गोल करणे, गटात न बसणारा शब्द ओळखून त्याला गोल करणे, शाब्दीक सापशिडी, शब्दांचा डोंगर तयार करणे. त्याचबरोबर संख्या लेखन अक्षरात अंकात, संख्यावर आधारीत सर्वांत लहान अंकी संख्या तयार करणे, सर्वांत मोठी संख्या तयार करणे, हातच्याच्या बेरजा, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे पाठांतर, विस्तारीत रूपावरून संख्या ओळखून लिहिणे, स्थानिक किंमत ओळखणे, वर्गमुळ, घनमुळ, पाठांतर करणे इंग्रजीतील शब्दकोष तयार करणे. उदा. ए पासून दहा शब्द ते झेडपर्यंत प्रत्येकी दहा शब्द संकलीत करणे, शब्द क...
Madhav Puyed : इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक माधव पुयड यांना पीएच.डी प्रदान -NNL

Madhav Puyed : इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक माधव पुयड यांना पीएच.डी प्रदान -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नवीन नांदेड येथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले माधव भुजंगराव पुयड यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने इंग्रजी विषयांमध्ये पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्यांनी डॉ. जीवन मसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली "न्यु हिस्टोरीसिझम इन द सिलेक्ट नोव्हेल ऑफ नयनतारा सहगल"हा विषय घेऊन आपले संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव, सचिव तथा माजी नगरसेवक ॲड.श्रीनिवास जाधव, प्राचार्य डॉ शेखर घुंगरवार, उपप्राचार्य डॉ. व्ही.आर.राठोड,इंग्रजी विषय विभाग प्रमुख डॉ. जी वेणुगोपाल,डॉ.गणेश लिंगमपल्ले, प्रो.डॉ. नागेश कांबळे, डॉ.ओमप्रकाश कांबळे,प्रा. प्रबुद्ध चित्ते, कार्यालयीन अधीक्षक आर.डी.राठोड यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध...
error: Content is protected !!