माळेगाव यात्रा l माळेगाव यात्रा वाढली पाहिजे त्याचा नाव लौकिक वाढवा यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे .त्याला कृतीची जोड देत देवसावरीच्या दुसऱ्या दिवशी प्रतापराव तमाशा कलावंत, अश्व व्यापारी यांना जाऊन भेटले.समस्या जाणून घेत जागीच शक्य त्याचे निवारण केले.कलामहोत्सव , शंकरपट,कुस्ती , त्याची बक्षिसे, सहभागी बैलगाडीधारकांना मानधन यात वाढ करावे शासकीय अनुदान वगळता वाढीव रक्कम आपण स्वतः देऊ.पैशाची चिंता करून नका .कलावंत नाराज होणार नाहीत याची दक्षता घ्यावी .
स्पर्धा -यात्रेचे व्यवस्थित नियोजन करावे असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिल्या
माळेगाव यात्रेत नव्या वर्षात २ तारखे पासून शासकीय कार्यक्रम सुरू होणार आहेत पण यात्रेच्या दुसऱ्या दिवशी स्वतः प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यात्रेत आलेले तमाशा कलावंताच्या तंबूत जाऊन भेटी घेतल्या. रघुवीर खेडकर , मंगला बनसोडे, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, आनंद लोकनाट्य मंडळ, हरिभाऊ बडे लोकनाट्य याच्या भेटी घेतल्या त्याच्या अडीअडचणी जाऊन घेतली .लोकनाट्य हे माळेगाव यात्रेचे एक खास वैशिष्ट्य होय.त्यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर याच्याकडे शासन दरबारी व स्थानिक पातळीवरील मागण्या मांडल्या .काही तात्काळ तेथेच सोडवण्यात आल्या.
माळेगाव यात्रेत आम्हा तमाशा कलावंतांना जेवढी सुरक्षा मिळते तेवढी राज्यात कुठेही मिळत नाही .खूप त्रास होतो हे केवळ आपल्या मुळे होत असते याची आम्हाला जाणीव आहे असा भावना तमाशा फड मालकांनी बोलून दाखवल्या.त्याच्या बक्षीस रक्कमेत वाढ, तसेच कुस्ती साठी पाहिले दुसरे तिसरे बक्षीस, शंकर पटाच्या शर्यतीत सहभागी झालेल्या बैलगाडी मालकांना वाढीव मानधन तसेच बक्षीस रककेमत वाढ करा .शासकीय अनुदान वगळता जेवढी अधिकची रक्कम लागेल तेवढे आपण स्वतः देऊ असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
मथुरा (उत्तर प्रदेश) येथून व्यापाऱ्यासाठी अश्व बाजारात पाणी व वीज सुविधा शेवटपर्यंत देण्याच्या तसेच घोडे उतरणे चढणे धक्के तयार करण्याच्या सूचना दिल्या .स्वतः प्रतापराव यात्रेत फिरून व्यापारी ,कलावंत याच्याशी बोलले .
पारंपरिक कला महोत्सवात आशा सुपलकर व शाहीर रमेश गिरी यांचा सन्मान करावा तसेच यात्रेकरू व्यापारी नाराज होऊ नयेत त्यासाठी सुविधा देण्याकरिता प्रशासन व आपण स्वतः प्रयत्नशील राहू असे सांगून यात्रे नंतर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत माळेगाव यात्रा परिसर विकास आराखडा बाबत बैठक घेण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
यावेळी माजी सभापती आनंदराव पाटील, सचिन पाटील चिखलीकर, बीडीओ आडेराघो, दता वाले, दिनेश तेललवार, हरिभाऊ चव्हाण, बांधकाम उपअभियंता शिवाजी राठोड, पाणीपुरवठा अभियंता वाडीकर विस्तार अधिकारी देशपांडे, दिनेश तेलंग, सरपंच प्रतिनिधी हणमंत धुळगंडे, ग्रामविकास अधिकारी देवकांबळे, विजय वाघमारे, बालाजी राठोड, भानुदास पवार, दिपक सूर्यवंशी यासह पदाधिकारी पत्रकार कर्मचारी उपस्थित होते.यात्रा भरभराटीसाठी प्रयत्न व कृतीची जोड दिली जात आहे.