Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

song singing competition : ग्रामीण महाविद्यालयात रंगली गीत गायन स्पर्धा -NNL

song singing competition : ग्रामीण महाविद्यालयात रंगली गीत गायन स्पर्धा -NNL

नांदेड, करियर
नांदेड/मुखेड| मुखेड तालुक्यातील ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर (कोटग्याळ) ता. मुखेड जि. नांदेड, सांस्कृतिक विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि.२४ आक्टोंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मुखेड तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हरिदास राठोड तर उद्घघाटक म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा. दिलीप गायकवाड होते. उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असते व विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे सांगितले तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. हरिदास राठोड सरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता स्पर्धकास शुभेच्छा दिल्या व सु...
Akashdive : उस्माननगर येथील कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनीनी बनविले “आकाशदिवे ” पालकांनी केले कौतुक -NNL

Akashdive : उस्माननगर येथील कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनीनी बनविले “आकाशदिवे ” पालकांनी केले कौतुक -NNL

नांदेड, करियर
उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यानुभव विषयावर आधारित दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर " आकाश दिवा निर्मिती " उपक्रम नुकताच घेण्यात आला. यास विद्यार्थ्यांनीनी सहभाग घेऊन आकाशदिवे बनविल्याने पालकवर्गातुन कौतुक होत आहे. मुख्याध्यापिका सौ.विद्या वांगे शाळेत शिक्षक शिक्षिका यांच्या सहकार्यातून शाळा स्तरावर विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी साठी अभ्यास पूर्ण नवचैतन्याची जाणीव करून देत असतात. प्रथम सत्राच्या परिक्षा संपल्यावर शाळेला दिपावली निमित्त सुट्टी असते. या अनुषंगाने दिपावली दिनाचे औचित्य साधून इयत्ता सहावीच्या वर्ग शिक्षिका सो. मिनाक्षी लोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. आकर्षक रंगसंगती, सुबकपणे साकारण्यात आलेल्या आकाशदिव्यांचे सर्व शि...
Traditional Shaheer Folk Art Conservation Board : पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ अध्यक्षपदी आनंदराव जळपते तर सचिव पदी पांडुरंग मिरासे यांची निवड -NNL

Traditional Shaheer Folk Art Conservation Board : पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ अध्यक्षपदी आनंदराव जळपते तर सचिव पदी पांडुरंग मिरासे यांची निवड -NNL

करियर, नांदेड
हिमायतनगर| कलावंतांच्या न्याय हक्का करता सदैव तत्पर असलेल्या पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी गायक आनंदराव जळपते तर सचिव पदी ह. भ. प. पांडुरंग मिरासे, उपाध्यक्षपदी विश्वंभर वानोळे, कोषाध्यक्षपदी विजय वाठोरे, संघटक पदी अविनाश कदम, सहसचिव प्रताप लोकडे, सह संघटक म्हणून सिद्धू भाऊ कवडे, कार्यकारणी सदस्य जनार्दन मिरासे, गौतम राऊत, बालाजी राऊत ,बालाजी डोखळे, यांची पारंपारिक लोककला महोत्सव पोटा बुद्रुक तालुका हिमायतनगर येथे 14 आक्टोंबर रोजी झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात निवड केली आहे. पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न कुमार मा.भवरे कामारीकर, प्रदेश अध्यक्ष रमेश नारलेवाड, जिल्हाध्यक्ष बापूराव जमदाडे, जिल्हा सचिव शाहीर सुभाष गुंडेकर, सुप्रसिद्ध गझलकार मधु बावलकर आदीलाबाद.हदगाव तालुका अध्यक्ष शाहीर माधव वाढवे,पत्रकार रेहाण पठाण भोकर,...
A one-day national workshop : ‘स्वारातीम’ विद्यापीठात एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न -NNL

A one-day national workshop : ‘स्वारातीम’ विद्यापीठात एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न -NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलामध्ये दि. २१ ऑक्टोबर रोजी गणितातील अलीकडील विकासावर ऑन सम रिसेंट डेव्हलपमेंट इन मॅथेमॅटिक्स या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन चेन्नई येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस चे वरिष्ठ गणित तज्ञ प्रो. के. श्रीनिवास यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसचे प्रो. के. श्रीनिवास, बिट्स पिलानी, हैदराबाद कॅम्पसचे (बीआयटीएस पिलानी) प्रो. बी. मिश्रा आणि आयआयआयटीडीएम, चेन्नईचे प्रो. एम. सुब्रमणी उपस्थित होते. प्रो. श्रीनिवास यांनी आपल्या उद्घाटन भाषणात गणित आणि सांख्यिकीमध्ये उपलब्ध असलेल्या विविध संधींबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी कष्टाचे महत्त्व, संशोधनाच्या नव्या दिशा आणि या क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी विविध संकल्पना म...
Dr. Shekhar Ghungarwar : नवतदारांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा – प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार -NNL

Dr. Shekhar Ghungarwar : नवतदारांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा – प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड| वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या नवमतदारांना मतदानाचे महत्व पटवून सांगण्यासाठी नांदेड दक्षिण स्विप उपक्रमा अंतर्गत वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात शुक्रवारी दि. २५ ऑक्टोबर रोजी जनजागृती मोहीम राबविण्यात आली, विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती विषयीची शपथ घेतली. लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी नवमतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले. राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभेसाठी पोटनिवडणूक दि. २० नोव्हेंबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात मतदारांसाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड दक्षिण स्विप उपक्रमा अंतर्गत वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या मार्गदर्शना खाली शुक्रवारी दि. २५ रोजी महाविद्यालयात मतदार जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. ...
Voter awareness rally : मतदार जनजागृती रैलीने देगलूर शहर दुमदुमले -NNL

Voter awareness rally : मतदार जनजागृती रैलीने देगलूर शहर दुमदुमले -NNL

Blog, करियर, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 50 टक्के पेक्षा कमी मतदान झालेले एकूण 25 मतदान केंद्रात असून त्यापैकी देगलूर शहरांमध्ये एकूण 10 मतदान केंद्र आहेत . प्रस्तुत 10 मतदान केंद्रात स्वीपद्वारे लक्ष केंद्रीत करण्यात येत असुन या भागात विविध उपक्रम राबवीण्यात येत आहेत. त्यामुळे देगलूर शहरांमध्ये जास्तीत जास्त मतदार जनजागृती व्हावी तसेच लोकांमध्ये मतदान महत्व व प्रक्रियेविषयी जनजागृती करण्यासाठी भव्य मतदार जन जागृती रैलीचे आयोजन करण्यात आले होते. देगलूर शहरातील साधना हायस्कूल , सावित्रीबाई फुले हायस्कूल , प. पु . गोळवलकर गुरुजी विद्यालय, पूजा पब्लिक स्कूल , मौलाना आझाद उर्दू स्कूल, ज्ञानसरस्वती इंग्लिश स्कूल व देगलूर शहरातील सर्व शाळेतील दोन हज़ार विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रस्तुत रैलीमध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक, शिक्ष...
Loksanwad ; 20 व्या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक प्रा महेश मोरे -NNL

Loksanwad ; 20 व्या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक प्रा महेश मोरे -NNL

नांदेड, करियर
नांदेड। करकाळा उमरी येथील श्री यशवंतराव चव्हाण ग्राम विकास व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विसाव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार प्रा महेश मोरे यांची एक मताने निवड झाली आहे. वर्ष 2025 च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भोकर येथील श्री शाहू महाराज हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हे संमेलन नियोजित आहे. संवेदना निवासस्थानी ऍड एल जी पुयड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सल्लागार समितीने सदरील निर्णय घेतला. यावेळी देविदास फुलारी, निर्मल कुमार सूर्यवंशी, प्रा.नारायण शिंदे, इंजिनीयर मिलिंद गायकवाड ,बापूराव पाटील आणि भगवान पाटील करकाळेकर यांची उपस्थिती होती . प्रा. महेश मोरे यांची ग्रंथसंपदा : शिवार १९९७ (कवितासंग्रह ),हिरवे रान २०००(कवितासंग्रह ), पाऊस काळ २००४ (कवितासंग्रह ), शेतकऱ्याचे आसूड (काव्यरूप ) २००८ , गाव...
Gangadhar Rathod ; आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा – गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड – NNL

Gangadhar Rathod ; आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा – गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड – NNL

लाइफस्टाइल, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे | आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर आपण व परिवारातील सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा. मतदान न केल्याने चुकीच्या व्यक्ती सत्तेत बसतात. तेव्हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या राज्याच्या व देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीला देखील आपलं ऐकावं लागेल यासाठी प्रत्येकांनी मतदान करावे. असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांनी केले. ८३- किनवट मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली येथील बळीराम पाटील महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच्या शुभारंभी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्राचार्य डॉ.एस.के. बेंबरेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी संपादक साजीद बडगुजर , पत्रकार आशिष देशपांडे य...
Ek Diva Khaki Uniform : महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ” एक दिवा खाकी वर्दीसाठी’; निबंध स्पर्धा -NNL

Ek Diva Khaki Uniform : महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ” एक दिवा खाकी वर्दीसाठी’; निबंध स्पर्धा -NNL

करियर, नांदेड
नांदेड| पोलीस हा एक असा सैनिक आहे, जो कायम नागरिकांच्या, समाजाच्या, कायद्याच्या रक्षणासाठी तैनात असतो. सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे 24 तास संरक्षण करणाऱ्या सैन्यदलातील सैनिकांसारखेच पोलीसही डोळ्यात तेल घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर असतात. गुन्हेगारांना शिक्षा होईल इतपत तपास करणे आणि सर्वसामान्यांना स्वातंत्र्याची अनुभूती घेता येईल असे वातावरण निर्माण करणे यासाठी पोलीस नेहमीच बंदोबस्तावर राहुन त्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती असते. अशा या पोलिसांबाबत बालवयातील विद्यार्थ्यांच्या मनात एक विशिष्ट प्रतिमा तयार झालेली असते. अगदी बालवाडी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील पोलिसांचे आकर्षण असते. शालेय मुलांच्या विचारांना आकार देण्याकरिता अंजनीआई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा संचलित अंजनी फाऊ...
Dr. Manohar Chaskar ; सिनेमा आपल्या ध्येयाचे प्रतिबिंब असावा-कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

Dr. Manohar Chaskar ; सिनेमा आपल्या ध्येयाचे प्रतिबिंब असावा-कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

नांदेड, करियर
नांदेड| सिनेमा ही कला आहे आणि तंत्र देखील आहे. सिनेमा तयार करण्यासाठी जीवनाकडे डोळे उघडे ठेवून पहा. ध्येयनिश्चिती शिवाय आपली अभिव्यक्ती दमदार होऊ शकत नाही. तुम्ही असा सिनेमा निर्माण करा त्यात आपल्या ध्येयाचे प्रतिबिंब असेल. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. राष्ट्रीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था,पुणे (एफटीआयआय) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेसिक कोर्स इन स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ या कोर्सचे कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एफटीआयआय चे कोर्स संचालक रितेश ताकसांडे, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. दीपक शिंदे, डॉ...
error: Content is protected !!