हिमायतनगर,दत्ता शिराणे| दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महा सभा तालूका कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली असून, सर्वानुमते पुनच्छ एकदा प्रताप लोकडे यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.


हिमायतनगर येथील नालंदा बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ८ सप्टेंबर रोजी एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिताताई खंदारे सरचिटणीस रविकिरण जोंधळे सा. ना. भालेराव, विजयमाला नरवाडे, सुभाष नरवाडे, अप्पाराव येरेकार, यांची प्रामूख्यानं उपस्थिती होती. सर्वानुमते तालुकाध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा प्रताप लोकडे यांना संधी देण्यात आली. तर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून सौ. छाया संदिप उमरे यांची निवड करण्यात आली.

इतर कार्यकारिणीत सरचिटणीस सुरेश गडपाळे, उपाध्यक्ष बाबासाहेब मुनेश्वर प्रताप पांडुरंग लोमटे, भालचंद्र पोपलवार, शिवाजी कदम, कोंडीबा पवार, अशोक हनवते, चंद्रकांत हनवते, संदेश तुळसे, गोविंद कांबळे, मारोती हनवते, बबन जाधव, संघपाल प्रधान, सुद्धोधन वाघमारे, प्रकाश सावते, अशोक पाटील, अनिल हट्टे, राजू सोनकांबळे, आदिंचा कार्यकारिणीत समावेश असून, नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
