लोहा| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्ग लोहा तालुक्यात ६०हजार २७० तर कंधार तालुक्यात ५८हजार ६९२ असे एकूण १ लक्ष १८हजार ९६२ लाभार्थी पात्र ठरले आहेत या बैठकीत ४४ हजार १६४ पात्र लाभार्थ्यांना अपरोव्हल देण्यात आले आहे .जे अर्ज त्रुटीत आहे त्याची पूर्तता करण्यात यावी. तसेच य योजनेचा जास्तीत जास्त महिला भगिनींना लाभ मिळाला पाहिजे. असे सांगून अधिकारी ,कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लोहा विधानसभा अध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले आहे.


लोहा तहसील कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लोहा विधानसभा अध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, बीडीओ डी के आडेराघो, कंधार नायब तहसीलदार रेखा चामनर, लोहा नायब तहसीलदार अशोक मोकले, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, समितीचे सदस्य ऍड. गंगाप्रसाद येन्नावार, ऍड मारुती पांढरे, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले अधिकारी, एकात्मिक बालविकास अधिकारी श्रीमती पवार मॅडम , संजय गांधी निराधार विभागाच्या प्रमुख श्रीमती वैशाली चाटे यासह संबधित कर्मचारी उपस्थित होत्या.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लोहा विधानसभा अध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,राज्याचे धाडसी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातील महिला भगिणीसाठी ही योजना सुरू केली आहे.


देशाचे खंबीर नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महायुती सरकार गोरगरीब शेतकरी ,कष्टकरी सर्वसामान्य माणसांच्या हिताचे निर्णय घेत आहेत असे नमूद केले. या योजनेत लोहा कंधार तालुक्यातील १ लक्ष १८ हजार ९६२ महिला पात्र झाल्या आहेत. कंधार तालुक्यात पूर्वी ३६हजार ५५ लाभार्थ्यांना अपरोव्हल देण्यात आले होते आजच्या बैठकीत २२हजार ६३७ अर्ज मंजूर झाले तर लोहा तालुक्यात पूर्वी ३५हजार ६०५ महिला लाभार्थी पात्र ठरले होते. आजच्या बैठकीत २४हजार ६६५ महिलांना अपरोव्हल दे यात आले आहे. जे अर्ज त्रुटीत आहेत त्या अर्जदारांच्या कागदपात्रांची पूर्तता करून ते पात्र व्हावेत असा सूचना दिल्या.


योजनेला समाजातील तळागाळात पोहोचवण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या अंगणवाडी सेविकां सुपरवायझर,तसेच दोन्ही तहसील कार्यालय कर्मचारी व सर्व संबधित याच्या सहकार्या बद्दल योजनेच्या अध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी समाधान व्यक्त केले. त्याचे अभिनंदन केले. अंगणवाडी सेविका, सुपरवायझर, तलाठी, ग्रामसेवक आदीसह कंधार लोहा तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


