HomeनांदेडVoice of Media's : नागेश पाटील कल्याण हे व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्य...

Voice of Media’s : नागेश पाटील कल्याण हे व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्य सेवा विशेष पुरस्काराने सन्मानित -NNL

नायगाव| साई शिर्डी च्या पावन भूमीत नुकतीच पार पडलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या विश्वव्यापी पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात ग्रामीण पत्रकार चळवळीतील व्हाॅईस ऑफ मीडिया चे नायगाव तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांना सेवा कार्य विशेष पुरस्कार सन्मान २०२४ ने गौरविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर बीडच्या माजी खासदार प्रितम मुंडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, माजी खासदार हेमंत पाटील, दै. देशोन्नती चे संपादक प्रकाश पोहरे, जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, पुढारी वृत्त वाहिनीचे प्रसन्न जोशी, राजश्रीताई पाटील, व्हाॅईस ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष संदीप भाई काळे, , प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्यवाहक बालाजी मारगुड, मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, पंढरिनाथजी बोकारे, नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी, बाळासाहेब पांडे आदींसह संघटनेचे देश व विदेशातील पदाधिकारी सदस्य आणि राज्यभरातील हजारो पत्रकार बांधवांची उपस्थिती मोठी उपस्थिती होती.

साई शिर्डी च्या दरबारी ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिखर अधिवेशनाद्वारे राज्य भरातील पत्रकारांसाठी दोन दिवसीय विशेष मेजवानी देत त्यांची प्रश्न पत्रकारीते पुढिल आव्हाने यावर विशेष मंथन करित यातुन निष्पन्न चर्चेतुन वेगवेगळे आठ ठराव मंजूर करून संघटनेद्वारे शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे निर्णय हि घेण्यात आले. अशा व्यापक अधिवेशनात नायगाव व्हाॅईस ऑफ मीडिया च्या सेवा कार्याची विशेष दखल घेऊन ग्रामीण पत्रकार चळवळीतील अग्रगण्य पत्रकार व्हाॅईस ऑफ मीडिया चे नायगाव तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांना व्हाॅईस ऑफ मीडिया चा सेवा कार्य विशेष पुरस्कार सन्मान २०२४ ने‌ गौरविण्यात आल्याने नायगाव व्हाॅईस ऑफ मीडिया टिमचे सर्वत्र कौतुक करून नागेश पाटील कल्याण यांना पुढिल वाटचालीसाठी सर्वस्तरातून शुभेच्छा हि देण्यात येत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments