Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Laxmikant Deshmukh ; मराठी भाषेची वाटचाल अभिजाततेकडून प्रगत ज्ञान भाषेकडे व्हायला हवी – लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन – NNL

Laxmikant Deshmukh ; मराठी भाषेची वाटचाल अभिजाततेकडून प्रगत ज्ञान भाषेकडे व्हायला हवी – लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन – NNL

नांदेड, करियर
नांदेड| ‘मराठी भाषा’ ही एक प्राचीन आणि सर्वोत्तम भाषा आहे. या भाषेने हजारो वर्षात अनेक वळणे घेतली आहेत. महाराष्ट्राची ओळख मराठी भाषेमुळेच आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठी भाषेची वाटचाल अभिजात भाषेकडून ‘प्रगत ज्ञान’ भाषेकडे व्हायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा जाहीर केल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा ज्ञान-विज्ञानाची भाषा कशी बनेल?’ या विशेष व्याख्यान प्रसंगी श्री. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. एन. मोरे, वि...
The publication of the braille book Mule va Phule ;मुले व फुले या ब्रेल लिपी पुस्तकाचे प्रकाशन निवासी अंध विद्यालय वसरणी येथे मोठ्या उत्साहात मध्ये संपन्न – NNL

The publication of the braille book Mule va Phule ;मुले व फुले या ब्रेल लिपी पुस्तकाचे प्रकाशन निवासी अंध विद्यालय वसरणी येथे मोठ्या उत्साहात मध्ये संपन्न – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l ज्योतिबा फुले सेवा ट्रस्ट निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड या शाळेमध्ये दिनांक 21 ऑक्टोंबर 2024 रोजी पांढरी काठी दिनाच्या अनुषंगाने औरंगाबाद आकाशवाणी केंद्राचे उदघोषक नितीनजी देशपांडे लिखित मुले व फुले या ब्रेल लिपी पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहामध्ये निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड येथे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. पुस्तकाचे प्रकाशक मुख्याध्यापक बाबाराव इबितवार निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड होते हे प्रकाशन संस्थेचे संस्थापक सचिव विठ्ठलराव संभाजीराव गुटे यांच्या हस्ते करण्यात आले औरंगाबाद आकाशवाणीचे उदघोषक श्री नितीन देशपांडे हे मागील तीस वर्षापासून या शाळेला दरवर्षी काही ना काही तरी वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असतात यावर्षी त्यांनी स्वतः कविता संग्रह लिहिला आहे आणि त्या कविता संग्रहाचं अंध मुलांसाठी ब्रेल लिपीतून अमरावती येथून पुस्तके छापून आणले आहे हे पुस्तक महाराष...
‘Jnantirtha-2024’ – ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न – NNL

‘Jnantirtha-2024’ – ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न – NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ संपन्न. या युवक महोत्सवामध्ये लातूर येथील दयानंद महाविद्यालय यांनी सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाने सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त केले. नृत्यऋषी दिवंगत ऋषिकेश देशमुख विजेता संघ फिरते चषक या कालाप्रकारामध्ये लातूर येथील जयक्रांती महाविद्यालय यांनी पारितोषिक प्राप्त केले. शोभायात्रा या कलाप्रकारामध्ये नांदेड येथील इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी प्रथम, तर द्वितीय (विभागून) कंधार येथील शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉम अँड सायन्स आणि शंकर नगर येथील मधुकरराव बापूराव पाटील महाविद्यालय यांना पारितोषिक देण्यात आले. तृतीय पारितोषिक (विभागवून) विष्णुपुरी...
Cinematographer Sankarshan Kharhade ; कला क्षेत्रात सातत्य, मेहनत ठेवल्यास नक्कीच यश मिळते- सिनेकलावंत संकर्षण कऱ्हाडे – NNL

Cinematographer Sankarshan Kharhade ; कला क्षेत्रात सातत्य, मेहनत ठेवल्यास नक्कीच यश मिळते- सिनेकलावंत संकर्षण कऱ्हाडे – NNL

करियर, नांदेड
नांदेड| कला क्षेत्रात करिअर करायची असेल तर कलावंतांनी अष्टपैलू राहिले पाहिजे. कलावंतांमध्ये सातत्य, मेहनत असावी लागते. कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्राचे मैदान सोडून जाऊ नये, यश आणि अपयश मनाला लावून घेऊ नये, अपयश हे आपल्यासाठी आवाहन आहे, असे मत सिने कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवातून घडलेला मी कलावंत असून, मी मराठवाड्याचा कलावंत असल्याचे माझी ओळख आहे. मुंबईमधील आणि मराठवाड्यातील कलाकारांमध्ये फरक आहे. मराठवाड्यातील कलावंत प्रामाणिक आणि साधे असतात असा माझा अनुभव असल्याचे सिनेकलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केले. ...
Prof. Sahebrao Dixit : प्रा. साहेबराव दिक्षित यांना पीएचडी पदवी जाहीर -NNL

Prof. Sahebrao Dixit : प्रा. साहेबराव दिक्षित यांना पीएचडी पदवी जाहीर -NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर येथील प्रा.साहेबराव दीक्षित यांना पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली. त्यांनी "महाराष्ट्रातील अन्न प्रशासन मराठवाडा विभागाचा एक चिकित्सक अभ्यास" या शीर्षका वर प्राचार्य डॉ.बी.एस.पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रशासन विषयांमध्ये संशोधन कार्य पूर्ण केले. यावेळी आयोजित मौखिक परीक्षेसाठी प्रा.डॉ.सुधीर दिंडे हे बहिस्थ परीक्षक म्हणून तर सामाजिक शास्त्र विद्या संकुलाचे डाॅ. बोधगिरे हे विद्यापीठ प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून होते. त्याचबरोबर सह मार्गदर्शक म्हणून स्वारातीम विद्यापीठ नांदेड च्या लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख मोहम्मद हनीफ इस्माईल साब हे उपस्थित होते. डॉ.साहेबराव दीक्षित यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे डॉ. बाळासाहेब भिंगोले, डॉ.बाजीराव वडवळे, डॉ.शरण निलंगेकर,डॉ. सखाराम वाघमारे,...
Many courses available in English : फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध -NNL

Many courses available in English : फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध -NNL

करियर, देश विदेश, नांदेड
मुंबई| आता फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक असून आज फ्रान्स येथील विद्यापीठांमध्ये किमान १७०० अभ्यासक्रम इंग्रजीतून राबविले जातात. फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणे आवश्यक नाही, असे प्रतिपादन फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले यांनी आज येथे केले. वाणिज्यदूत सेरे शार्ले यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. आयआयटी मुंबई व फ्रान्सचे इकोल पॉलिटेक्निक यांच्यात शैक्षणिक सहकार्य व विद्यार्थी परस्पर आदानप्रदान याबाबत नुकताच करार झाला असल्याचे फ्रान्सच्या वाणिज्यदूतांनी यावेळी राज्यपालांना सांगितले. फ्रान्सच्या अंदाजे ५०० कंपन्या मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक येथे कार्यरत असून त्याठिकाणी रोजगार निर्मिती तसेच कौशल्य वर्धन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्स भारताशी वैज्ञ...
Dr. Ashok Kalantri ; रोटरी क्लब तर्फे डॉ.अशोक कलंत्री सन्मानित -NNL

Dr. Ashok Kalantri ; रोटरी क्लब तर्फे डॉ.अशोक कलंत्री सन्मानित -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l हॉटेल सिम्पनी (सिटी प्राईड) नांदेड येथे रोटरी क्लबच्या भव्य दिव्य कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजकार्य करणारे डॉ.अशोक कलंत्री यांच्या यथोचित सन्मान करण्यात आला. ह्या प्रसंगी रोटरी गव्हर्नर डॉ.सुरेश साबू ,रोटरी नांदेडचे अध्यक्ष डॉ.संजय पतंगे,डॉ.व्यंकटेश काब्दे,सुरेश आंबुलगेकर ,संजय अवस्थी, श्री /सौ गरुडकर डॉ.शिवाजी वाडेकर, डॉ.मालू,किशोर पावडे ,कैलास पाटणी, सि.ए.गादेवार,डॉ.आश्विन लव्हेकर, डॉ.करूणा पाटील यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. ह्या प्रसंगी डॉ.अशोक कलंत्री म्हणाले पोलिओमुक्ती साठी शासनाच्या बरोबरीने काम करणाऱ्या सर्व रोटरी सदस्यांना हा पुरस्कार समर्पित करतो अशी भावना व्यक्त केली असून या सन्मान बदल मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे....
CIDCO ; अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ.बेग यांनी पदभार स्वीकारला -.

CIDCO ; अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ.बेग यांनी पदभार स्वीकारला -.

नांदेड, करियर
नवीन नांदेड l नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे तब्बल चार दिवसांनंतर आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ. मिर्झा ‌फरतुल्ला बेग यांची नियुक्ती केली असल्याचे आदेश 18‌ ऑक्टोबर रोजी काढले असून 19‌रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे, अतिरिक्त पदभार मुळे कार्यालयीन कामासह प्रलंबित अनेक कामे खोळंबली जाण्याची शक्यता वर्तवली जात असुन पदभार स्वीकारल्या नंतर तात्काळ कर निरीक्षक व वसुली लिपीक यांच्यी बैठक घेऊन वसुली साठी प्राधान्य देण्याचे आवाहन केले. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे प्रभारी सहाय्यक आयुक्त व वसुली लिपीक यांनी नाव परिवर्तन संचिका साठी लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ चार दिवसांपूर्वी पकडले होते, यानंतर सहाय्यक आयुक्त हे पद‌ रिक्त होते ,तर कार्यालयीन परिसरात कर्मचारी यांच...
Santseva Lal Samrudhi Laman Tanda Yojana : संतसेवालाल समृध्दी लमाण तांडा योजनेच्या तालुका समितीवर विकास राठोड, महेश जाधव यांची निवड -NNL

Santseva Lal Samrudhi Laman Tanda Yojana : संतसेवालाल समृध्दी लमाण तांडा योजनेच्या तालुका समितीवर विकास राठोड, महेश जाधव यांची निवड -NNL

करियर, नांदेड
हदगांव| संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजनेंतर्गत गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली. या समितीवर सदस्यपदी हदगाव तालुक्यातील मुळचे पांगरी तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विकास राठोड़ व महेश जाधव या दोघाची हदगाव तालुका समितीवर यांची नियुक्ती करण्यात आली. ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय क्र. तांडा सुधार-२०१९/प्र.क्र.६७/आस्था-५, दि.२३ फेब्रुवारी २०२४ अन्वये संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृध्दी योजना अंमलबजावणी करण्यासाठी हदगाव तालुका स्तरावर दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंजारा लमाण तांडा वस्ती घोषित करणे, गावठाण जाहिर करणे, तांड्याला महसूली गाव घोषित करण्याची कार्यवाही करणे, ग्रामपंचायत स्थापन करण्याची कार्यवाही करणे इत्यादी व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृध्दी योजनेच...
youth festival ; युवक महोत्सवातील विडंबनातून सामाजिक राजकीय प्रश्नाला फोडली वाचा – NNL

youth festival ; युवक महोत्सवातील विडंबनातून सामाजिक राजकीय प्रश्नाला फोडली वाचा – NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानतीर्थ-२०२४’आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या जयवंत दळवी नाट्य मंचावर विडंबन या कला प्रकारातून स्पर्धकांनी देश आणि राज्य पातळीवरील सामाजिक आणि राजकीय ज्वलंत विषयांना वाचा फोडली. राजश्री शाहू महाराज लातूरच्या वैभव काकडे, ऋतुराज सुरवसे, प्रशांत पाटील यांनी भाजीपाला नावाचे विडंबन सादर केले. या विडंबनातून देशातील बेरोजगारी मोठमोठ्या परीक्षेत होत असलेले घोटाळे, राजकारण्यांची भूमिका यामुळे समाजाचे झालेले नुकसान आधी ज्वलंत विषयांना वाचा फोडण्याचे काम केले. देशातील भयान वास्तविकता, विडंबनाच्या माध्यमातून युवकांनी समोर आणली. शिवाजी कॉलेज परभणी येथील स्पर्धकांनी ‘परिपाठ’ नावाचे विडंबन सादर केले. यामध्ये शाळेमध्ये प्रतिज्ञा, प्रास्ताविक, राष्ट्रगीत घेतली जाते पण ...
error: Content is protected !!