youth festival ; युवक महोत्सवातील विडंबनातून सामाजिक राजकीय प्रश्नाला फोडली वाचा – NNL
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानतीर्थ-२०२४’आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या जयवंत दळवी नाट्य मंचावर विडंबन या कला प्रकारातून स्पर्धकांनी देश आणि राज्य पातळीवरील सामाजिक आणि राजकीय ज्वलंत विषयांना वाचा फोडली.
राजश्री शाहू महाराज लातूरच्या वैभव काकडे, ऋतुराज सुरवसे, प्रशांत पाटील यांनी भाजीपाला नावाचे विडंबन सादर केले. या विडंबनातून देशातील बेरोजगारी मोठमोठ्या परीक्षेत होत असलेले घोटाळे, राजकारण्यांची भूमिका यामुळे समाजाचे झालेले नुकसान आधी ज्वलंत विषयांना वाचा फोडण्याचे काम केले. देशातील भयान वास्तविकता, विडंबनाच्या माध्यमातून युवकांनी समोर आणली. शिवाजी कॉलेज परभणी येथील स्पर्धकांनी ‘परिपाठ’ नावाचे विडंबन सादर केले. यामध्ये शाळेमध्ये प्रतिज्ञा, प्रास्ताविक, राष्ट्रगीत घेतली जाते पण ...









