HomeनांदेडSankalp of environmentally friendly Ganeshotsav : महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला पर्यावरण...

Sankalp of environmentally friendly Ganeshotsav : महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संकल्प -NNL

नांदेड| प्रदुषणाची समस्या लक्षात घेता गणेशोत्सव साध्या व पारंपरिक पद्धतीने साजरा करणे गरजेचे झाले आहे. परंपरे नुसार पार्थिव गणेशाची स्थापना करणे योग्य आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आणि त्याला दिलेले रासायनिक रंग यामुळे पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित होत आहे. प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसावा या साठी शाडू माती पासुन गणेश मूर्ती बनवणे व घरीच एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात विसर्जन करणे योग्य ठरेल असे प्रतिपादन कला शिक्षिका व पक्षीमित्र कविता जोशी यांनी केले.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. आर. कदम यांच्या प्रेरणेने महात्मा फुले हायस्कूल बाबानगर सकाळ सत्र, दुपार सत्र आणि विजयनगर शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. इयत्ता 5 ते 10 वी च्या 200 विद्यार्थ्यांनी 3 दिवस वेगवेगळ्या गटांत शाडू मातीच्या सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. कला शिक्षिका कविता जोशी यांनी अतिशय सोप्या पद्धतीने गणेशाचे शिल्प कसे घडवावे ते सांगीतले.

विद्यार्थी अतिशय तन्मयतेने मूर्ती शिल्प साकारत होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका एस. आर. कदम, पर्यवेक्षक ए. आर. कल्याणकर, पर्यवेक्षिका जे. सी. महाराज व व्ही. आर. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव रावसाहेब शेदारकर व कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चव्हाण यांनी कार्यशाळेस भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी संतोष पांडागळे, जी. जे. जाधव, साहेबराव मावले, ज्ञानेश्वर डोंगरे, अनिकेत हंबर्डे, संतोष सूर्यवंशी, कोल्हे, सावळे उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments