Thursday, May 21

Tag: an environment-friendly Ganeshotsav

Sankalp of environmentally friendly Ganeshotsav : महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संकल्प -NNL

Sankalp of environmentally friendly Ganeshotsav : महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संकल्प -NNL

नांदेड, करियर
नांदेड| प्रदुषणाची समस्या लक्षात घेता गणेशोत्सव साध्या व पारंपरिक पद्धतीने साजरा करणे गरजेचे झाले आहे. परंपरे नुसार पार्थिव गणेशाची स्थापना करणे योग्य आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आणि त्याला दिलेले रासायनिक रंग यामुळे पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित होत आहे. प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसावा या साठी शाडू माती पासुन गणेश मूर्ती बनवणे व घरीच एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात विसर्जन करणे योग्य ठरेल असे प्रतिपादन कला शिक्षिका व पक्षीमित्र कविता जोशी यांनी केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. आर. कदम यांच्या प्रेरणेने महात्मा फुले हायस्कूल बाबानगर सकाळ सत्र, दुपार सत्र आणि विजयनगर शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. इयत्ता 5 ते 10 वी च्या 200 विद्यार्थ्यांनी 3 दिवस वेगवेगळ्या गटांत शाडू मातीच्या सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. कला शिक्षिक...
error: Content is protected !!