श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| पर्यावरण तथा पशुसंवर्धनमंत्री पंकजाताई मुंडे (Pankajatai Munde) यांनी सोमवार दि.२० जाने.रोजी सायं.५ वा.श्री रेणुकामाता मंदिरात जाऊन विधिवत पूजा अर्चा केली.

यावेळी मंदिरातील कार्यालयात तहसीलदार तथा कोषाध्यक्ष किशोर यादव,विश्वस्त संजय काण्णव यांनी त्यांचा सत्कार केला. तत्पूर्वी त्यांनी दत्तशिखर संस्थानवर भगवान दत्तात्रेय स्वामींचे दर्शन घेतले. ना.पंकजाताई यांचे माहूर नगरीत आगमन होताच,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनायक मुसळे यांनी पाच जेसीबी मशीनच्या सहाय्याने त्यांचेवर पुष्पवृष्टी केली.

ना.पंकजाताई यांनी शहरातील मुंडे चौकात लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी आ.भीमराव केराम, देविदास राठोड,तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, शहराध्यक्ष पुरोषोत्तम लांडगे,प्रा.राजेंद्र केशवे,अनिल वाघमारे, नगरसेवक सागर महामुने, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा निर्मला जोशी, स्वाती आडे, तालुका सरचिटणीस अर्चना दराडे, पद्मा गिऱ्हे,राधा उपलेंचवार, विजय आमले, तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे,निळकंठ मस्के,हनुमंत मुंडे,रामकिसन केंद्रे,सदबा मुंडे,नंदकुमार जोशी,राजु दराडे आदींची उपस्थिती होती.
