नांदेड| राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश नांदेडच्या वतीने शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित बैठकीत हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी प्रशांत राहुलवाड (Prashant Rahulwad) यांची निवड करण्यात आली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु. येथील रहिवाशी प्रशांत राहुलवाड यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याला पाहतात. दैनिक अर्थ वृत्तपत्रांच्या हिमायतनगर तालुका प्रतिनिधी म्हणुन नियुक्ती करण्यात आली. आजच्या पत्रकारीता क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल मीडिया तसेच दैनिक वर्तमानपत्राद्वारे अनेक पत्रकार कार्य करत आहेत. पत्रकार क्षेत्रातील नव्याने नावलौकिक मिळवलेले हिमायतनगर तालुक्यातील पत्रकार प्रशांत राहुलवाड यांनी आपल्या निर्भीड, लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.

अगदी सामाजिक शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत.या वेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन जी कुलथे, केंद्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष राजकुमार बिर्ला, केंद्रीय उपाध्यक्ष डॉ अनिल शिरसाट, केंद्रीय निरीक्षक संदीप महाजन, मराठवाडा विभागीय अध्यक्ष शुद्धोधन हनवते, जिल्हा अध्यक्ष अनुप आगाशे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद कुंडेकर, नांदेड शहराध्यक्ष प्रदीप जैन, माहूर तालुका अध्यक्ष गणेश खडसे, हिमायतनगर तालुका कार्याध्यक्ष अनिल नाईक, शहराध्यक्ष मनोज तपासकर, शहर उपाध्यक्ष विजय भालेराव, उपस्थित होऊन सहकारी मित्रांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
