नांदेड| नांदेडच्या विमानतळ पोलीस स्टेशनच्या पथकाने पोलीस अधीक्षक व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून आरोपी शेख अब्दुल खादर शेख नन्नु वय 64 वर्ष व्यवसाय बेकार रा. 7-106 मन्यार गल्ली कंधार जि. नांदेड ह.मु. टायरबोल्ट देगलुर नाका नांदेड यांच्याकडून त्याचे जवळील एका पिवळया रंगाचे प्लॅस्टीकचे पोते जप्त करून आरोपीवर कारवाई करुन त्याचे ताब्यातुन 3 किलो 88 ग्रॅम वजनाचा गांजाचा (seized 3 kg 88 grams of ganja) मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैद्य धंदयावर आळा घालण्याचे सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड येथील पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. विमानतळ नांदेड येथील अधिकारी व अमंलदार यांनी वरील नमुद गुन्हयातील एन.डी.पी.एस.वर छापा मारणे कामी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने, शासकिय पंचा समक्ष छापा टाकून आरोपी शेख अब्दुल खादर शेख नन्नु वय 64 वर्ष व्यवसाय बेकार रा. 7-106 मन्यार गल्ली कंधार जि. नांदेड ह.मु. टायरबोल्ट देगलुर नाका नांदेड यांच्याकडून त्याचे जवळील एका पिवळया रंगाचे प्लॅस्टीकचे पोते जप्त केले.

त्या पोत्यामध्ये पोलाद गजचे पांढऱ्या रंगाचे चिकट पटटी मध्ये गुंडाळलेले गांजाच्या झाडाचे अवशेष ज्यास पाने, फुले, बीया असलेले ज्याचे एकुण वजन 03 किलो 88 ग्रॅम वजनाचे किमती रुपयाचे प्रति किलो 12,000/- प्रमाणे किमतीचे असा एकुण 36,000/- रुपये जु.वा. कि.अ. मिळुन आल्याने त्याचे विरुध्द वरील प्रमाणे गुन्हा नोंद करुन पुढील तपास सहा. पो. निरी. जोंधळे पो.स्टे. विमानतळ नांदेड हे करीत आहेत.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, किरितिका सी.एम. सहायक पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली, गणेश चव्हाण पोलीस निरीक्षक पो.स्टे. विमानतळ नांदेड श्री विनोद साने पो.उप. निरीक्षक पो.स्टे. विमानतळ नांदेड, पोहेकॉ. दारासिंग राठोड,पो. कॉ. राजेश माने, पोहेकों. आरसुळे, पो.कॉ. नागनाथ स्वामी, .पो.कॉ. कुलथे यांनी केली आहे.
