HomeनांदेडGrand inauguration : हिमायतनगरचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांच्या जनसंपर्क...

Grand inauguration : हिमायतनगरचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ

हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ आज माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली असून, नागरिकांच्या सेवेसाठी हे कार्यालय कार्यरत राहील अशी माहिती प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनी यावेळी दिली. त्यांच्या या जनसंपर्क कार्यालयाचा फायदा जनसेवेसाठी होईल अशी अपेक्षा माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

akh Grand inauguration : हिमायतनगरचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ

यावेळी माजी जी.प.सदस्य समद खान, सुभाष राठोड, गणेश शिंदे, गजानन सूर्यवंशी, फेरोज खान पठाण, संजय माने, मायंबा होळकर, राजू झरेवाड, आदींसह कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्ते, जनप्रतिनिधी आणि नागरिक, काँग्रेस सह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित होऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक उपस्थित झाले होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments