HomeनांदेडBlacklist the name of the contractor | हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली...

Blacklist the name of the contractor | हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली अंतर्गत रस्त्यांच्या कामांत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांचे नांव काळ्या यादीत टाका – NNL

अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्यांच्या मराठवाडा कार्याध्यक्षा सौ.सिमा स्वामी लोहराळकर यांनी केली

हिमायतनगर| हिमायतनगर ते पळसपूर, डोल्लारी, या अंतर्गत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, प्रवाश्यांना या अंतर्गत रस्त्यावरून जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आणी म्हणून संबंधित गुतेदार (सिद्दीकी, छत्रपतीसंभाजीनगर) यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्यांच्या मराठवाडा कार्याध्यक्षा सौ.सिमा स्वामी लोहराळकर यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय नांदेड यांना दिलेल्या निवेदनात सिमा स्वामी बोराळकर यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कोट्‌यावधी रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. परंतु जवळपास तिन वर्षांचा कार्यकाळ संपला असून, या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. या अंतर्गत या रस्त्यावर पुलाचे काम अर्धवट असल्याने प्रवाश्यांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

FB IMG 1721709496893 Blacklist the name of the contractor | हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली अंतर्गत रस्त्यांच्या कामांत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांचे नांव काळ्या यादीत टाका - NNL

छत्रपती संभाजी नगर येथील सिद्दीकी नावाचा गुतेदार यांनी वरील कामाचे बारा वाजविले आहेत. कामाचा अवधी संपुष्टात येवून ही काम पुर्णत्वास आले नाही. गुतेदाराने या विभागाचे कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उप अभियंता व तसेच कार्यकारी अभियंत्याला मॅनेज करून सुधारीत मुल्यांकन करून निधी उचल केला असल्याचे येथील ग्रामस्थांकडून सातत्याने ओरड होत आहे. सद्यस्थितीत मात्र कामाची अवस्था जैसे थे असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर पसरला आहे.

नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत असल्याने गुतेदाराने परवाच या अंतर्गत रस्त्याचे काम हिमायतनगर कडून सुरुवात केली आणि ते आता बंद झाले आहे. पहिल्या उखडलेल्या रस्त्यावर सोलीग अंथरून त्यावर मुरुमाच्या नावाखाली माती टाकण्याचे काम सुरु केले आहे. पाऊस पडल्यानंतर या अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याचे चित्र स्पष्ट पणे दिसत आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषी गुतेदार सिद्दीकी, छत्रपती संभाजीनगर यांचे नाव काळ्या टाकण्यात यावे, आणि वरिल कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी. उपरोक्त कारवाईस विलंब झाल्यास, या प्रकरणी आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशाराही सौ.सिमा स्वामी लोहराळकर व तसेच नागोराव शिंदे यांनी दिला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments