Homeक्राईमपोस्टे शिवाजीनगर यांनी मोटार सायकल चोरीतील दोन आरोपी गजाआड 3 लक्ष 60...

पोस्टे शिवाजीनगर यांनी मोटार सायकल चोरीतील दोन आरोपी गजाआड 3 लक्ष 60 हजाराचा मुद्येमाल जप्त -NNL

नांदेड। दिनांक 21.08.2024 रोजी पोस्टे शिवाजीनगर येथे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन मोटार सायकल जप्त करण्याचे आदेश पोनि जालींदर तांदळे पोस्टे शिवाजीनगर यांना दिले होते. त्यावरून पोस्टे शिवाजीनगर यांनी मोटार सायकल चोरीतील दोन आरोपीतास  गजाआड करून त्यांच्याकडून 3,60,000/- रू मुद्येमाल जप्त केला आहे.

दिनांक 21.08.2024 रोजी पोस्टे शिवाजीनगर गुरन 341/2024 कलम 303 (2) भा.न्या. संहीता कायदा प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोनि श्री जालींदर तांदळे, पोस्टे शिवाजीनगर यांचे सुचने प्रमाणे पोस्टे शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथक तपास करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, 1) साहील राजु गोडबोले, वय 21 वर्षे, रा. आंबेडकर नगर, नांदेड 2) अजय सुभाष पोहरे, वय 27 वर्षे, रा. जनता कॉलनी नांदेड हे मोटार सायकल चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेतले.

आणि मोटार सायकल चोरीचा तपास करीत असतांना सदर गुन्हयातील मोटार सायकल आमीच चोरलो असे सांगुन ती मोटार सायकल लेबर कॉलनी हनुमान मंदीरा समोर मोकळ्या जागेत ठेवल्याचे सांगीतले. आम्ही सदर मोटार सायकल पंचा समक्ष ताब्यात घेवुन त्यांना आणखी विश्वासात घेवुन तपास केला असता, त्यांनी आणखी पाच मोटार सायकली चोरल्याची कबुली दिल्याने त्या मोटार सायकली आरोपी क्रमांक 2 यांचे घरी जनता कॉलनी नांदेड येथे ठेवल्याचे सांगीतल्याने, आम्ही पंचासमक्ष त्या पाच मोटार सायकली जप्त केल्या. अशा एकुण चोरीच्या 6 मोटार सायकली किंमती 3,60,000/- रू चा मुद्येमाल सदर आरोपीतांच्या ताब्यातुन जप्तकरण्यात आल्या आहेत.

सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, सुशिल कुमार, उपविभागीय पोलीस अधीकारी इतवारा चार्ज नांदेड शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि जालींदर तांदळे, गुन्हे शोध पथकातील सपोनि अश्रुबा घाटे, पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, देवासिंग सिंगल, शेख अझहर, राहुल लाठकर, सरबजीतसींग पुसरी, दत्ता वडजे यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंद केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments