HomeनांदेडDhanegaon Vasrani Duddeari Chowk ; धनेगाव वसरणी दुधडेअरी चौकातील नामफलक विटंबना करणाऱ्या...

Dhanegaon Vasrani Duddeari Chowk ; धनेगाव वसरणी दुधडेअरी चौकातील नामफलक विटंबना करणाऱ्या युवकावर कडक कार्यवाही करावी, समाज बांधवांची मागणी – NNL

नांदेड l धनेगाव,वसरणी दूधडेअरी येथील महर्षी मार्कंडेय चौक नामफलका जवळ विटंबना करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या युवकावर अत्यंत कठोर कारवाई करणे तसेच मार्कंडेय चौकाच्या परिसरातील अवैध धंदे बंद करावे व अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी समाज बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे.विटंबना झालेल्या चौकास शुध्दीकरण करून विधीवत पुजन १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले.

दूधडेअरी विणकर वसाहत धनेगाव, वसरणी येथील मुख्य चौकास नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेने मान्यता देऊन महर्षी मार्कंडेय चौक* असे नामकरण केले आहे. त्या ठिकाणी तशा नावाचा बोर्ड व स्तंभ आहे या महर्षी मार्कंडेय चौकाच्या आजूबाजूस अतिक्रमण झालेले असून या चौकामध्ये अवैध धंदे ग्रामीण पोलीस स्टेशनचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने टवाळखोर मुलांची तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची या भागांमध्ये दहशत होत असून या भागांमध्ये गरीब विणकर समाजाची वस्ती असून या गुंड प्रवृत्तीच्या मुलांकडून या भागात नेहमीच त्रास होत आहे.

दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी रात्री एका विकृत मानसिकतेच्या टारगट मुलाने या ठिकाणी महर्षी मार्कंडेय चौक नाम फलकाच्या बोर्डाजवळ विंटबना करून पद्मशाली समाजाच्या तसेच हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, विटंबना करणाऱ्या युवकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून महर्षी मार्कंडेय चौक,विणकर वसाहत, धनेगाव या परिसरातील अतिक्रमण निष्कासित करण्यात यावे अशी मागणी केली आहे,यावेळी दुधडेअरी नाम फलकाची विधीवत पुजन करण्यात आले.

यावेळी अखिल भारत पद्मशाली संघमचे अध्यक्ष श्रीधर सुंकरवार, शिवसेना संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ मारावार, लेबर फेडरेशन चे चेरमन लक्ष्मीकांत गोणे,भाजपा ओबीसीचे शहराध्यक्ष व्यंकटेश जिंदम,भाजपाचे शहर उपाध्यक्ष जगन्नाथ बिंगेवार, महीलाधक्षा कविता गड्डम,अशोक श्रीमनवार,माजी नगरसेवक गोविंदसेठ कोकुलवार, नागनाथ गडम, नागेश कोकुलवार, माजी नगरसेवक संजयभाऊ मोरे, अण्णा अनलदास, बाबुअण्णा पिचकेवार,गणेश गुंडेवार, व्यंकटराव चिलवरवार, व्यंकटराव गुंडाळे,भुमाजी मामीडवार, जिल्हाध्यक्ष संग्राम निलपत्रेवार, धंनजय गुम्मलवार, उमेश कोकुलवार, शिवशंकर सिरमेवार, विजय वडेपल्ली, शास्त्रीसेठ मंजुवाले, शंकरराव कुंटुरकर, विजय गड्डम, किशोर राखेवार, रविंद्र पेंटल, नागभुषण दुर्गम,प्रकाश बोगा,गणेश गोणे, गोपीचंद धनेगावकर, जलबाजी गोंटलवार, माणिक यलगांधलवार, श्रीनिवास माडेवार, संतोष गुम्मलवार, विनोद गुम्मलवार, गजानन वासमवार, प्रल्हाद गुजरवार, प्रविण राखेवार, शंकरराव राखेवार प्रभाकर मेहरकर, प्रभाकर शिंदे, सुभाष गराडे, माधव गुडेवार,गोपाळ अंचेवार,नरसिंग गडपवार, राजु बोटलवा, विनोद वंगलवार,जयनारायण मंचेवार, व्यंकटेश अमृतवार,मलेश बल्ला, अजय चौधरी, टॉपसन सुंकेवार, कृष्णा कोकुलवार,धनंजय माडेवार, यांच्या सह शेकडो समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेऊन संबंधितावर कठोर कार्यवाही व बेकायदेशीर धंदे व अतिक्रमण हटविण्यासाठी शिष्टमंडळ भेट घेणार आहेआह

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments