नांदेड l २० सप्टेंबर २०२४ रोज शुक्रवारी हिगोलीहुन दुपारी २वाजता प्रदेशाध्यक्ष काशीनाथ माळी नांदेड नगरीत येणार असुन, शहरात महात्मा पुतळ्यास पुष्पहार घालून कौठा मार्गे होळकर नगर सिडको येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या आढावा बैठकिला ३ वाजता उपस्थित राहाणार आहेत . बैठकी नंतर संध्याकाळी ६. वाजता लोहा मार्गे लातूर कडे निघणार आहेत.
बैठकीत येत्या सन २०२४ मधिल विधानसभा निवडणुकाच्या संबंधाने प्रत्येक मतदारसंघचा आढावा घेणार आहेत.


या बैठकीला राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर,प्रदेश सचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर, मराठवाडा अध्यक्ष विष्णु गोरे, यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहावे. येते वेळी आपापल्या मतदारसंघातील आढावा अहवाल सोबत घेवून यावे .


असे आवाहन जिल्हाध्यक्ष भगवानराव मुंढे,जिल्हा महिलाध्यक्षा अरूणा साखरे,जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव नाईक,सचिव चंद्रकांत रोडे,पिराजी धूळगंडे,उत्तम वाडीकर, माधव सलगरे ,शहराध्यक्ष दिपक कोटलवार,शहर सचिव गंगाधर होळकर ,शहराध्यक्षा भाग्यश्री हाके यांनी केले आहे.
