Homeनांदेडपालकमंत्र्यांच्या हस्ते धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा गौरव; ‘सामाजिक आयकॉन’ हा ११५...

पालकमंत्र्यांच्या हस्ते धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा गौरव; ‘सामाजिक आयकॉन’ हा ११५ वा पुरस्कार

नांदेड, प्रतिनिधी| वर्षभरात तब्बल ९० विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी सेवाकार्याची अखंड ज्योत तेवत ठेवणारे ज्येष्ठ समाजसेवक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या बहुआयामी सामाजिक कार्याचा भव्य सोहळ्यात गौरव करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण कार्यालय, नांदेड आणि सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ॲड. ठाकूर यांना ‘सामाजिक आयकॉन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, हा ॲड. दिलीप ठाकूर यांचा ११५ वा पुरस्कार ठरला.

नांदेड येथील कुसुम सभागृहात झालेल्या या सोहळ्यास खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, समाज कल्याण तथा सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भाजपाचे संजय कोडगे, चैतन्यबापू देशमुख, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, सचिन उमरेकर, सुरेश लोट, व्यंकटेश साठे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी ॲड. दिलीप ठाकूर यांच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. निवेदक प्रा. ओमप्रकाश दरक यांनी ॲड. ठाकूर यांच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचा उल्लेख करत त्यांच्या सेवाकार्याला ‘समाजसेवेतील एव्हरेस्ट’ अशी उपमा दिली.

गरजू आणि वंचित घटकांना आधार देण्यासाठी ॲड. ठाकूर यांच्याकडून वर्षानुवर्षे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्यांच्या समाजसेवेची व्याप्ती आणि सातत्य लक्षात घेऊन विविध सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी आतापर्यंत त्यांना तब्बल ११५ पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

यामध्ये महाराष्ट्र रत्न, लोकशाही मराठवाडा रत्न, मराठवाडा भूषण, नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार, देवदूत उपाधी, कर्मयोगी पुरस्कार, दीनबंधू सेवा पुरस्कार, गुरूवर्य पांडूरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार, लायन्स एप्रिसिएशन अवॉर्ड, दि लिजेंड अवॉर्ड, नंदिग्राम एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड, संवेदना राष्ट्रीय पुरस्कार, मानवता के सेवक पुरस्कार, कृतज्ञता उत्सव पुरस्कार, नांदेड के सांता, शान-ए-नांदेड, इन्स्पायर पर्सनॅलिटी, आदर्श शिवसैनिक पुरस्कार, राजपूत भूषण पुरस्कार, माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार, राजे छत्रपती शिवाजी गौरव पुरस्कार, सेवाभाई पुरस्कार, मातोश्री गंगुताई पुरस्कार, जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय अनुग्रह पुरस्कार, तिरंगा गौरव पुरस्कार, लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवॉर्ड, कृतज्ञता सेवा पुरस्कार, राजरत्न पुरस्कार, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, मराठी अपडेट गौरव पुरस्कार यांसह अनेक मान-सन्मानांचा समावेश आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या अत्यंत कठीण काळातही ॲड. ठाकूर यांनी समाजसेवेची धुरा अखंडपणे सांभाळली. त्यांच्या कार्याची दखल घेत तब्बल २२ संस्थांनी त्यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानित केले. यापैकी १६ संस्था मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्राबाहेरील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. समाज कल्याण विभागानेही त्यांच्या कार्याचा गौरव ‘संवेदनशील सेवा पुरस्कार’ देऊन केला आहे.

दरम्यान, लायन्स क्लबतर्फे प्रांतपाल ला. राहुल औसेकर यांनी मानाची पिन आणि मोत्याची माळ देऊन ॲड. दिलीप ठाकूर यांचा विशेष सत्कार केला. ला. योगेश जायस्वाल, ला. दिलीप मोदी, ला. जयेश ठक्कर आणि ला. अमरसिंह चौहान यांनीही त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

ॲड. दिलीप ठाकूर यांना मिळालेल्या ११५ व्या पुरस्काराबद्दल शिवप्रसाद राठी, प्रा. लक्ष्मी पुदरोड, स्नेहलता जायस्वाल, मानिनी नांदेडकर, सुरेश शर्मा, गणेशसिंह परमार, जगतसिंह ठाकूर, संतोष बच्चेवार, प्रकाश उंटवाले, संजय चौधरी, बिना चौहान यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले. त्यांच्या पुढील समाजसेवी वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments