HomeनांदेडDevkrupa goshala ; नांदेड जिल्ह्यातील देवकृपा गोशाळेच्या कार्याचा मध्य प्रदेशात गौरव -NNL

Devkrupa goshala ; नांदेड जिल्ह्यातील देवकृपा गोशाळेच्या कार्याचा मध्य प्रदेशात गौरव -NNL

नांदेड। दि 15/09/2024 रोजी दयोदय महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन खजुराहो जिल्हा भोपाळ येथे नियोजित होते. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात मागील 1 वर्षांपासुन सुरू असलेल्या पारदर्शक यशस्वी गोरक्षणाच्या कार्याची दखल घेऊन श्री किरण सुभाष बिच्चेवार, गोरक्षा प्रांत आंदोलन प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत तथा अध्यक्ष देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र पवना तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड यांना आमंत्रित केले होते. सदरील अधिवेशनात गुजरात, राजस्थान, ऊत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातुन गोरक्षक व गोसेवक उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात अतिशय प्रतीकुल परीस्थितीचा सामना करत मागील 1 वर्षात केलेल्या ऐतिहासिक गोरक्षणाच्या यशस्वी लढ्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रेमचंद जैन प्रेमी, राष्ट्रीय मंत्री श्री राकेश जैन, महाराष्ट्र प्रभारी श्री तुषारजी जैन आणि श्री ऊध्दवजी नेरकर, सदस्य गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर उपस्थित हजारो गोसेवकांपैकी किरण बिच्चेवार यांना परम पुजनीय आचार्य भगवंत श्री समयसागरजी महाराज यांना श्रीफळ अर्पण करण्याचा बहुमान देण्यात आला आहे.

याविषयी किरण बिच्चेवार यांनी सांगितले हे सन्मान माझा एकट्याचा नसुन विश्व हिंदु परिषद – बजरंग दल आणि गोरक्षकांचा आहे. मी केवळ प्रातिनिधिक स्वरूपात हे सन्मान स्विकारला आहे तसेच माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर जाऊन आचार्य श्री समयसागरजी महाराज यांची कृपादृष्टी लाभली त्यामुळे मी धन्य झालो आहे. आमच्या गोरक्षणाच्या पारदर्शक कार्याची दखल दयोदय महासंघ मुंबई यांनी घेतली आणि सन्मानित केले त्याबद्दल मी दयोदय महासंघाचा आभारी आहे.

गोरक्षणाचे हे दैवी ईश्वरीय कार्य आता देवगीरी प्रांतातील 14 जिल्ह्यात ऊभे करण्याचे आव्हान माझ्यापुढे आहे. मला खात्री आजपर्यंत ज्या ज्या गोभक्तांनी मला कळतनकळत सहकार्य केले आहे, त्यांच्या सहकार्याची मला भविष्यात देखील नितांत गरज आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments