Devkrupa goshala ; नांदेड जिल्ह्यातील देवकृपा गोशाळेच्या कार्याचा मध्य प्रदेशात गौरव -NNL
नांदेड। दि 15/09/2024 रोजी दयोदय महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन खजुराहो जिल्हा भोपाळ येथे नियोजित होते. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात मागील 1 वर्षांपासुन सुरू असलेल्या पारदर्शक यशस्वी गोरक्षणाच्या कार्याची दखल घेऊन श्री किरण सुभाष बिच्चेवार, गोरक्षा प्रांत आंदोलन प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत तथा अध्यक्ष देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र पवना तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड यांना आमंत्रित केले होते. सदरील अधिवेशनात गुजरात, राजस्थान, ऊत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातुन गोरक्षक व गोसेवक उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात अतिशय प्रतीकुल परीस्थितीचा सामना करत मागील 1 वर्षात केलेल्या ऐतिहासिक गोरक्षणाच्या यशस्वी लढ्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रेमचंद जैन प्रेमी, राष्ट्रीय मंत्री श्री राकेश जैन, महाराष्ट्र प्रभारी श्री तुषारजी जैन आणि श्री ऊध्दवजी नेरकर, सदस्य गोसेव...
