HomeनांदेडNanded Railway Division : नांदेड रेल्वे विभागाची धडक कारवाई; एका दिवसात १,०८७...

Nanded Railway Division : नांदेड रेल्वे विभागाची धडक कारवाई; एका दिवसात १,०८७ विनातिकीट व अनियमित प्रवासी जाळ्यात

सुमारे ₹६ लाखांचा दंड वसूल

नांदेड, प्रतिनिधी | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट प्रवाशांविरोधात धडक मोहीम राबवत एका दिवसात १,०८७ जणांवर कारवाई केली. या कारवाईत ₹५,९८,३३५ इतका दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे रेल्वेने अवघ्या १५ तासांत २९ गाड्यांची तपासणी करून ही मोठी कारवाई केली.

दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाच्या निर्देशानुसार ३ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० ते सायंकाळी ७.३० या कालावधीत हजूर साहिब नांदेड–आदिलाबाद, नांदेड–परभणी–जालना–छत्रपती संभाजीनगर–मनमाड, परभणी–परळी वैजनाथ आणि पूर्णा–अकोला मार्गांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.

कारवाईत ५१६ विनातिकीट प्रवासी, १५७ अनियमित प्रवासी आणि ४१४ बुक न केलेल्या सामानाची प्रकरणे आढळून आली. त्यातून अनुक्रमे ₹४.०४ लाख, ₹१.१७ लाख आणि ₹७६ हजार असा दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय ५ अनधिकृत फेरीवाल्यांकडून ₹१० हजारांचा दंड, तर अस्वच्छता करणाऱ्या ४ जणांकडून ₹१,१०० दंड आकारण्यात आला. धूम्रपानाशी संबंधित कोणतेही उल्लंघन आढळले नाही. या मोहिमेत ३२ तिकीट तपासणी स्क्वॉड, १४९ तिकीट तपासनीस, १४ स्टेशन तपासणी कर्मचारी, ४ विभागीय वाणिज्य निरीक्षक आणि ३ आरपीएफ जवान सहभागी झाले होते.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत आणि रेल्वे नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी अशा धडक मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments