Homeनांदेडmonth of Shravan : वाढोणा (हिमायतनगर) येथे पवित्र श्रावण मासानिमित्त भव्य धार्मिक...

month of Shravan : वाढोणा (हिमायतनगर) येथे पवित्र श्रावण मासानिमित्त भव्य धार्मिक कथा सोहळ्यांचे आयोजन

दिनांक 14 पासून चालणार श्री परमेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

वाढोणा / हिमायतनगर,अनिल मादसवार | येथील जागृत व पुरातन श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी, वाढोणा ता.हिमायतनगर जि.नांदेड यांच्या वतीने पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण मासानिमित्त सलग तीन संगीतमय कथा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदू पंचांगानुसार पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात दिनांक 13 ऑगस्ट 2026 (गुरुवार) रोजी होत आहे आणि हा पवित्र महिना 11 सप्टेंबर 2026 रोजी संपणार आहे. त्यानिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरात महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 14 ऑगस्ट पासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल चालणार आहे.

पहिले पुष्प – संगीतमय श्रीमद् भागवत कथा
प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प. सुश्री स्नेहाताई (माई) आठवलेकर यांच्या सुमधुर वाणीतून दि. 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2025 पर्यंत दररोज दुपारी 02 ते सायं. 05 या वेळेत ही कथा होणार आहे. दि. 21 ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन होऊन कथेचा समारोप होईल. कथा सोहळ्यादरम्यान श्रीकृष्ण लीलांचे वर्णन आणि प्रमुख झाकीतून भगवंताचे दर्शन घडविले जाणार आहे

दुसरे पुष्प – संगीतमय श्री संतचरित्र कथा
ह.भ.प. संतोष महाराज पवार संकुलकर (श्रीधाम कुंठलगिरी) यांच्या रसाळ वाणीतून दि.23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2025 पर्यंत दररोज दुपारी 02 ते सायंकाळी 05 या वेळेत संतचरित्र कथा होईल. दि. 30 ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनाने या कथेची सांगता होईल. कथा सोहळ्यातुन विविध संतांचे चरित्र वर्णन झाकीच्या माध्यमातून उपतशीत भाविकांना दर्शन होणार आहे.

parmeshwar month of Shravan : वाढोणा (हिमायतनगर) येथे पवित्र श्रावण मासानिमित्त भव्य धार्मिक कथा सोहळ्यांचे आयोजन 

तिसरे व अंतिम पुष्प – संगीतमय श्री शिवमहापुराण कथा
प.पू. श्री हेमंतजी महाराज शास्त्री (जगतगुरु) यांच्या मुखारविंदातून दि. 01 सप्टेंबर ते 07 सप्टेंबर 2025 पर्यंत दररोज दुपारी 02 ते सायं. 05 या वेळेत शिवपुराण कथा होणार आहे. दि. 08 सप्टेंबर रोजी काल्याचे कीर्तन व त्यानंतर श्रावण मास कथा सोहळ्याची सांगता म्हणून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथा सोहळ्यातुन देवाधिदेव भगवान श्री महादेवाची अमृत गाथा झाकीसह भाविकांना श्रावण करता येणार आहे.

दररोज कथा समाप्तीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून हा महाप्रसाद दानदात्यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आला आहे. या पवित्र कथा सोहळ्याचा लाभ वाढोणा, हिमायतनगरसह पंचक्रोशीतील सर्व भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर, उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते यांच्यासह सर्व संचालक मंडळ, पुजारी व ग्रामस्थ वाढोणा यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments