माळाकोळी| लोहा तालुक्यातील खेडकरवाडी येथे महात्मा बसवेश्वर सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रा .मनोहर धोंडे यांच्या हस्ते श्रीची आरती करण्यात आली .

यर नांदेड येथील लावणी डाॅ.विद्याश्री शिवाजी यमचे या बालिकेने विवीध गाण्यावर आपले नृत्य सादर केले. कु.अंकिता सुधाकर दगडगावे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवला त्यांनी कराटेचे महत्व पटवून दिले.महिलासाठी कराटे काळाची गरज आहे असे सांगितले. बरोबर लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गावातील बालगोपाळानी आपली कला सादर केली.

मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक माधव झरे,अरुण खेडकर,बसवेश्वर नागसाखरे, विरभद्र मिटकरे ,संतोष वंलाडे, मारोती नागसाखरे ,माधव नेळगे, संतोष नेळगे ,शिवा खेडकर,सिध्देश्वर खेडकर, नागनाथ नागसाखरे ,विश्वनाथ नेळगे ,बसवेश्वर नेळगे ,शिवलींग नागसाखरे , नामदेव कारेगावकर गावातील जनसमदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता .सुत्रसंचालन पत्रकार बालाजी नागसाखरे यांनी केले.
