Homeक्राईमAttemted to murder ; जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास ७ वर्षे सश्रम...

Attemted to murder ; जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास ७ वर्षे सश्रम कारावास तर तिघांना 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL

नांदेड। नांदेड जिल्ह्यातील पुणेगाव येथे निवडणुकीच्या जुन्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास ७ वर्षे सश्रम कारावास 50 हजार दंड तर तिघांना 5 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 10 हजार दंड अशी शिक्षा मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश -३, श्रीमती आर.एम. पटवारी यांनी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हनुमंत संभाजीराव पुयड, रा. पुणेगाव, ता.जि. नांदेड यांनी यशोसाई हॉस्पीटल कौठा येथे आयसीयु युनीट २ मधील बेड क.३ मध्ये उपचार घेत असताना जबाब दिला की, आई वडील एक भाउ बहीण व पत्नी एक मुलगी असे राहतो आमची पुणेगाव येथे २० एकर जमिन असुन, आम्ही शेती करुन कुटूंबाची उपजिवीका भागवितो. जानेवारी २०२१ मध्ये मी सरपंच म्हणुन निवडुन आलेला असुन ग्रामपंचायत पुणेगाव येथे सरपंच आहे. दि.१५ मे २०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजण्याच्या सुमारास माझा भाउ संदीप व त्याचा मित्र धनंजय भोसले असे आमदुरा येथे कार्यक्रमात गेले होते.

सायंकाळी ०५.०० वाजताच्या सुमारास मी व गुरुनाथ कदम, आनंदा पुयड, संदीप कदम ग्रामपचांयत कार्यालयासमोर बसलेले असताना शिवराज पुयड याने सांगितले की, संदीप‌ला रणजित, सर्जेराव, संजय, भानुदास हे गावाकडे येणा-या पुलावरील रोडवर मारीत आहेत. म्हणुन आम्ही सर्व त्यांच्याकडे गेलो तेव्हा रणजित सर्जेराव हे लोखंडी रॉडने व संजय आणि भानुदास हे काठीने भाउ संदीप व धंनजय भोसले यांनी मारीत होते. मला पाहुन तु आमच्या चुलत्याच्या विरुध्द ग्रामपंचायतला उभा राहुन सरपंच झालास काय..? तुला तर आता जिवंत मारतो असे म्हणुन मला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने माझे डोक्यात मारणार तो घाव माझे डाव्या हातावर लागल्याने हात फॅक्चर झाला.

त्याच वेळी भानुदास पुयड याने आता याला सोडु नको जिवे मारुन टाका असे म्हणाला असता सर्जेराव पुयड त्यांच्या हातातील रॉडने जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारले. त्याच वेळी भानुदास पुयड, संजय पुयड याने त्याच्या हातातील काठीने डोक्यात, हातावर, पाठीवर, पायावर मारहान केली. नंतर चक्कर आली व बेशुध्द पडलो. अशा फिर्यादवरुन १. रणजित भानुदास पुयड, २. सर्जेराव भानुदास पुयड, ३. संजय गोविंदराव पुयड, ४. भानुदास मोतीराम पुयड यांच्या विरुध्द पोलीस ठाणे, नांदेड ग्रामीण येथे गु.र.नं २९८/२०२२ कलम ३०७, ३२६, ३२४ सह कलम ३४ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल झाला. गुन्हयाचा तपास स.पो.नि. थोरात यांनी करुन दोषारोप ज्याचा सत्र खटला क्र. 177/2022 आहे तो न्यायालयात दाखल केले.

आरोपी विरुध्द दोषारोप सिध्द करण्यासाठी सरकार पक्षाने एकुण ११ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुन मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश-३, श्रीमती आर.एम. पटवारी यांनी आरोपींना दोषी ठरवुन आरोपी क.१ रणजित भानुदास पुयड याला कलम ३०७ भा.दं.वि अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व दंड रुपये ५०,०००/- अशी शिक्षा सुनावली. तसेच आरोपी क.२. सर्जेराव भानुदास पुयड, आरोपी क.३ संजय गोविंदराव पुयड व आरोपी क.४ भानुदास मोतीराम पुयड, सर्व रा. पुणेगाव जि. नांदेड यांना भा.दं.वि चे कलम ३२६ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी दंड रुपये १०,०००/- अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील श्री रणजीत देशमुख यांनी काम पाहिले. तसेच फिर्यादी तर्फे विधीज्ञ श्री. बी.आर. भोसले आणि विधीज्ञ श्री विनोद कदम यांनी पण बाजु मांडली. सत्र न्यायालय कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन पो.हे.कॉ. चंद्रकांत पांचाळ यांनी काम पाहिले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments