Attemted to murder ; जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास ७ वर्षे सश्रम कारावास तर तिघांना 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील पुणेगाव येथे निवडणुकीच्या जुन्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास ७ वर्षे सश्रम कारावास 50 हजार दंड तर तिघांना 5 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 10 हजार दंड अशी शिक्षा मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश -३, श्रीमती आर.एम. पटवारी यांनी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हनुमंत संभाजीराव पुयड, रा. पुणेगाव, ता.जि. नांदेड यांनी यशोसाई हॉस्पीटल कौठा येथे आयसीयु युनीट २ मधील बेड क.३ मध्ये उपचार घेत असताना जबाब दिला की, आई वडील एक भाउ बहीण व पत्नी एक मुलगी असे राहतो आमची पुणेगाव येथे २० एकर जमिन असुन, आम्ही शेती करुन कुटूंबाची उपजिवीका भागवितो. जानेवारी २०२१ मध्ये मी सरपंच म्हणुन निवडुन आलेला असुन ग्रामपंचायत पुणेगाव येथे सरपंच आहे. दि.१५ मे २०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजण्याच्या सुमारास माझा भाउ संदीप व त्याचा मित्र धनंजय भोसले असे आमदुरा येथे कार्यक्रमात गे...
