HomeनांदेडCitizens of Sapti : हदगावच्या साप्ती गावच्या नागरिकांनी दिला शिवमहापुराण कथा...

Citizens of Sapti : हदगावच्या साप्ती गावच्या नागरिकांनी दिला शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी खारीचा वाटा

नांदेड,अनिल मादसवार| पिंपळगाव येथे असलेल्या श्री दत्त संस्थान परिसरात आगामी मार्च महिन्यातील दिनांक 6 ते 13 या सात दिवसाच्या काळात भव्य शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या धार्मिक कार्यात आपला सहभाग असावा या उद्देशाने हदगावच्या साप्ती गावच्या नागरिकांनी दत्त संस्थानाला भेट देऊन तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांचे शॉल व पुष्पहाराने स्वागत करत आशीर्वाद घेत आपला खारीचा वाटा दिला आहे.

जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथे असलेल्या श्री दत्त संस्थान परिसरात आगामी मार्च महिन्यातील दिनांक 6 ते 13 या सात दिवसाच्या काळात भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळगाव संस्थानचे परमपूज्य गोवत्स तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याची गेल्या वर्षभरापासून जय्यत तयारी सुरु आहे.

IMG 20250215 181321 Citizens of Sapti : हदगावच्या साप्ती गावच्या नागरिकांनी दिला शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी खारीचा वाटा

या कार्यक्रमाची माहिती मिळताच नं भूतो नं भविष्यती होणाऱ्या सत्संग सोहळ्याचे भागीदार होण्यासाठी हदगाव तालुक्यातील साप्ती गावच्या नागरिकांनी शनिवारी पिंपळगाव दत्त संस्थानाला भेट देऊन तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांचे शॉल व पुष्पहाराने स्वागत करत दर्शन व आशीर्वाद घेतले. या सोहळ्यासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी समजून आमच्या गावातील सर्व नागरिकांच्या वतीने खारीचा वाटा भेट म्हणून दिला असल्याचे सांगितले आहे.

या धार्मिक सोहळ्याच्या काळात संपूर्ण सात दिवस सेवाधारी म्हणून सहभागी होणार असल्याचा मानसही साप्ती गावच्या नागरिकांनी बोलून दाखवत सर्वानी या कुंभ काळात आयोजित भव्य शिवमहापुराण सत्संग सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही केलं आहे. यावेळी साप्ती गावचे नागरिक उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments