नवीन नांदेड l इंदिरा गांधी हायस्कूल सिडको नवीन नांदेड येथील 1998 च्या 10 वी च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपसली.

29 सप्टेंबर रोजी एकूण इंदिरा गांधी हायस्कूल येथील 1998 च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मैत्रीचा जिव्हाळा या अंतर्गत 24 वर्षानंतर सर्व विद्यार्थी आज एकमेकांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले होते याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे 24 वर्षानंतर शाळेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्यांना सर्व शालेय जीवनातला प्रत्येक आठवणी ताज्या झाल्या व यातील काही विद्यार्थ्यां हे अतिशय भाऊक होऊन त्यांचा कंठ सुद्धा या ठिकाणी दाटून आलेला होता 24 वर्षानंतर त्यांना भेटणारे सर्व गुरुजन याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हॉटेल मंजू पॅलेस या ठिकाणी त्यांना शिकवलेल्या गुरुजनांचा सत्कार सोहळ्याचे सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले होते.

सर्वप्रथम शाळेमध्ये त्यांनी येऊन शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना जे शाळेतील होतकरू वरील विद्यार्थी आहेत असे यांना शालेय साहित्याचे वाटप सर्व विद्यार्थ्यांनी मिळून केले . याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जी.एम.शिंदे व 1998 चे विद्यार्थी राहुल वाघमारे, डॉक्टर रणजीत किलजे, डॉक्टर प्रशांत गुनावत सह इतर 126 इतक्या मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेमध्ये उपस्थित होते
