नवीन नांदेड। कै. नारायणराव भालेराव हायस्कूल स्नेह नगर नांदेड येथे जिल्हास्तरीय आयोजित विज्ञान प्रदर्शन मध्ये इंदिरा गांधी हायस्कूल हडको ने माध्यमिक गटात प्रथम तर व प्राथमिक गटात दुसरा क्रंमाक पटकावला असुन संस्थेचे पदाधिकारी , शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रकल्प सादर करणार्या विधार्थी व मार्गदर्शक गुरूजानाचे अभिनंदन केले आहे.


नांदेड येथे कै. नारायण भालेराव हायस्कूल नांदेड येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, प्रदर्शनात पाचवी ते सातवी छोटा गट व आठवी ते दहावी मोठा गट असे दोन गट ठेवण्यात आले होते. यापैकी मोठ्या गटाला प्रथम क्रमांकाचे तर छोट्या गटाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. मोठ्या गटाने सेंद्रिय शेती व कमीत कमी खताचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढता येईल यावर मॉडेल तयार केले होते.

यामध्ये अर्णव देशमुख,अर्थव बिडवई व सत्यम नागठाणे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.3100 रुपये रोख सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.तर छोट्या गटाने ग्लोबल वार्मिंग विकासाच्या वाटेवर, विनाशाच्या लाटेवर याद्वारे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या ज्वलंत विषयाची जाणीव विज्ञान प्रदर्शनात करून दिली. यामध्ये पलक राठोड, प्रियंका किरवले, प्रणिता गडगिळे, प्रेम ढाकणे व सुमित लोंढे यांचा समावेश होता.2100 रोख, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रमशील शिक्षक एम.टी. कदम व उपक्रमाशील शिक्षिका हिप्परगेकर यांनी मार्गदर्शन केले. सदरील जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवण्यामागे शाळेचे मुख्याध्यापक जी.एम.शिंदे ,पर्यवेक्षक गोकुळवाले पर्यवेक्षिका सौ.कोलेवाड व शाळेतील सर्व विज्ञान शिक्षक यांची प्रेरणा आहे . या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शाळेचे संस्थेचे माननीय अध्यक्ष अशोकराव चव्हाण उपाध्यक्षा अमिताताई चव्हाण, संस्थेचे सचिव डी.पी.सावंत ,सहसचिव शेंदारकर खजिनदार निंबाळकर , शालेय समितीच्या अध्यक्षा श्वेता पाटील ,कार्यकारिणी सदस्या जया ताई,कार्यकारिणी सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, या सर्वांनी अभिनंदन केले.
