HomeनांदेडCidaco ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत २४०० मालमत्ता धारकांना लोक अदालत...

Cidaco ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत २४०० मालमत्ता धारकांना लोक अदालत नोटीसचे वाटप -NNL

नवीन नांदेड। नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लोक अदालत जवळपास २४०० थकीत मालमत्ता धारकांना नोटीसचे वाटप करण्यात आले आहे कर निरीक्षक, वसुली लिपीक यांच्या माध्यमातून नोटीसा देण्यात आले असून मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करावे असे आवाहन सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी केले आहे.

नावामनपाचा वतीने आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मालमत्ता विभाग अजीत- पालसिंग संधु , यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या थकीत मालमत्ता धारकांसाठी मनपाने लोक अदालत २८ सप्टेंबर रोजी मुख्यालय मनपा येथे आयोजन केले.

यात एक लाख, पन्नास हजार,तिस हजार व थकीत असलेल्या जवळपास जवळपास २४०० मालमत्ता धारकांना सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांच्या सहकार्याने कर निरीक्षक संजय नागापूरकर,मारोती सारंग, प्रकाश दर्शने, यांच्या माध्यमातून विवेकानंद लोखंडे,महेद्रं पठाडे, रमेश यशवंतकर, रविंद्र पवळे, सुधीर कांबळे, नरसिंग कुलकर्णी, दिपक जौधंळे, राहुल पाईकराव यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक १९ व २० मधील जवळपास २४०० मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून, २८ सप्टेंबर आयोजित लोक अदालत मध्ये मालमत्ता धारकांच थकीत शास्तीवर ८०/ टक्के सुट देण्यात येणार असून मालमत्ता धारकांनी थकीत कर भरून जप्ती टाळावी व कर भरून सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments