Cidaco ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत २४०० मालमत्ता धारकांना लोक अदालत नोटीसचे वाटप -NNL
नवीन नांदेड। नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लोक अदालत जवळपास २४०० थकीत मालमत्ता धारकांना नोटीसचे वाटप करण्यात आले आहे कर निरीक्षक, वसुली लिपीक यांच्या माध्यमातून नोटीसा देण्यात आले असून मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करावे असे आवाहन सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी केले आहे.
नावामनपाचा वतीने आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मालमत्ता विभाग अजीत- पालसिंग संधु , यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या थकीत मालमत्ता धारकांसाठी मनपाने लोक अदालत २८ सप्टेंबर रोजी मुख्यालय मनपा येथे आयोजन केले.
यात एक लाख, पन्नास हजार,तिस हजार व थकीत असलेल्या जवळपास जवळपास २४०० मालमत्ता धारकांना सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांच्या सहकार्याने ...
