HomeनांदेडPunyashlok Ahilyadevi Holkar : सिडको भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर...

Punyashlok Ahilyadevi Holkar : सिडको भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यी जयंती साजरी

नवीन नांदेड| सिडको भाजपा महिला मोर्च्या तर्फे पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात महिलानीं साजरी केली.

यावेळी महाराष्ट्र शासन महिला बालकल्याण विभागातर्फे दिला जाणारा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार ललिता शिंदे,बोकारे (इस. 1999-2001),तसेच विजयाताई गोडघासे (इस. 2023-2024)यांना मिळालेला असल्यामुळे,त्त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून सिडकोतील सर्व महिलांनी दोघींचा अहिल्यादेवीच्यां जयंतीचे औचित्य साधून अहिल्या देविंची प्रतिमा शाल श्रीफळ देवून यथोचित सत्कार केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.मीरा कोत्तावार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी सत्कार मूर्ती ललिता शिंदे बोकारे यांनी अहिल्यादेवी च्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकून त्त्यांच्या सामाजिक धार्मिक राजकीय,औद्योगिक कार्याची उपस्थित महिलानां माहिती करुन दिली. तदनंतर सौ. विजया गोडघासे यांनी महिलांना अहिल्यादेवी सारखे सत्यवादी, निर्भीड आणि उद्योगी बनण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मामडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुणा करडखेले, गुरुमाय,कदमताई,सुषमा शिंदे, अनुराधा पूरी,राधा जोशी, अरुणा बंडेवार, लक्ष्मी माडेवार, शामा बिरादार व इतर कार्यकर्त्यांनीं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले, यावेळी उपस्थित महिलाचे आभार माया जाधव हिने केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments