Punyashlok Ahilyadevi Holkar : सिडको भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यी जयंती साजरी
नवीन नांदेड| सिडको भाजपा महिला मोर्च्या तर्फे पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात महिलानीं साजरी केली.
यावेळी महाराष्ट्र शासन महिला बालकल्याण विभागातर्फे दिला जाणारा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार ललिता शिंदे,बोकारे (इस. 1999-2001),तसेच विजयाताई गोडघासे (इस. 2023-2024)यांना मिळालेला असल्यामुळे,त्त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून सिडकोतील सर्व महिलांनी दोघींचा अहिल्यादेवीच्यां जयंतीचे औचित्य साधून अहिल्या देविंची प्रतिमा शाल श्रीफळ देवून यथोचित सत्कार केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.मीरा कोत्तावार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी सत्कार मूर्ती ललिता शिंदे बोकारे यांनी अहिल्यादेवी च्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकून त्त्यांच्या सामाजिक धार्मिक राजकीय,औद्योगिक कार्याची उपस्थित महिलानां माहिती करुन दिली. तदनंतर सौ. विजया गोडघासे यांनी मह...
