Homeनांदेड‘पाणी आडवा, पाणी जिरवा’च्या गजरात नांदेडमध्ये जलसंधारण दिन साजरा

‘पाणी आडवा, पाणी जिरवा’च्या गजरात नांदेडमध्ये जलसंधारण दिन साजरा

महावॉकेथॉन ‘वॉक फॉर वॉटर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; रील स्पर्धेची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढवली

नांदेड| ‘माती वाचवा, पाणी वाचवा, सुरक्षित भविष्य घडवा’, ‘जल है तो कल है’, ‘आजचे पाणी संवर्धन, उद्याचे सुरक्षित भविष्य’ आणि ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अशा जलसंवर्धनाच्या संदेशांनी शुक्रवारी नांदेड शहर दुमदुमले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने जलसंधारण दिन आणि महावॉकेथॉन ‘वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले.

शासकीय तंत्रनिकेतन मैदान येथे आयोजित या उपक्रमात आमदार जयाताई चव्हाण, महापौर कविता मुळे, कुलगुरू मनोहर चासकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, मृदा व जलसंधारण अधीक्षक अभियंता अजित परांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाने, जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग – महावॉकेथॉनमध्ये नांदेड शहरातील यशवंत महाविद्यालय, महात्मा फुले हायस्कूल बाबानगर, राजर्षी शाहू महाराज हायस्कूल वसंतनगर, केंब्रिज हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, पीपल्स हायस्कूल, के.आर.एम. महाविद्यालय, सम्राट अशोक हायस्कूल, एनएसबी कॉलेज, गुजराती हायस्कूल आदी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात मृदा व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कामांची चित्रप्रदर्शनीही भरविण्यात आली होती. यावेळी जलसंधारणाचे महत्त्व आणि पाणी बचतीचा संदेश देण्यात आला.

wok 1 ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’च्या गजरात नांदेडमध्ये जलसंधारण दिन साजरा

3 किलोमीटर महावॉकेथॉन – शासकीय तंत्रनिकेतन मैदानापासून महावॉकेथॉनला सुरुवात झाली. व्हीआयपी रोड, महात्मा फुले चौक, डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियल मार्गे पुन्हा शासकीय तंत्रनिकेतन मैदान असा सुमारे तीन किलोमीटरचा मार्ग या महावॉकेथॉनसाठी निश्चित करण्यात आला होता. उपस्थित मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉनला सुरुवात केली आणि स्वतःही सहभाग नोंदविला. महावॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नागरिक व विद्यार्थ्यांनी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ची शपथ घेत जलसंवर्धनाचा संदेश दिला. सहभागींची ईश्वरचिठ्ठी काढून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

wok 2 ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’च्या गजरात नांदेडमध्ये जलसंधारण दिन साजरा

रील स्पर्धेला 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – जलसंधारण दिनानिमित्त आयोजित भव्य रील स्पर्धेला तरुणांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन स्पर्धेची अंतिम मुदत 30 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरुणांच्या सर्जनशील कल्पनांना व्यासपीठ मिळावे आणि जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता अनिल कांबळे यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देशमुख आणि विष्णू गोडबोले यांनी केले, तर आभार कार्यकारी अभियंता अनिल कांबळे यांनी मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments