किनवट, परमेश्वर पेशवे। दिंनाक २८ स्पटेंबर रोजी शहीद भगतसिंग यांच्या जंयती निम्मीत्ताने अभिवादन, माकप महासचिव काॅ.सीताराम येचुरी यांना अदरांजली तथा कार्यकर्त्यांचा मेळावा काॅ.अर्जुन आडे यांच्या अध्यक्षतेखाली गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालय येथे संपन्न झाले.
गेली अनेक दशके माकपने किनवट मतदार संघात जनतेच्या बाजूने अनेक लढे लढले असुन जमिन मालकीच्या हक्कापसुन ते शेतकरी- कष्टकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन सतत रस्तावरची लढाई समोर घेऊन गेली आहे.वन, देवस्थान जमिनीचा प्रश्न असो की चिमटा धरण विरोधी संघर्षाचे, हामीभाव,पिकविमा, अतिवृष्टी अनुदान, कर्जमाफीचे प्रश्न असो अथवा शेतमजुरांच्या रोजगाराचे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, भुमिहिंनाचे प्रश्न,योजना कर्मचाऱ्यांचे प्रश्न,किनवट जिल्हा होण्याचे प्रश्न सातत्याने राजकीय पटलावार वरील प्रश्नांवर माकपा ने हस्तक्षेप केला आहे,या राजकीय पाश्वभुमीवर महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून मविआने किनवट मतदारसंघ माकपाला सोडावा अशी आग्रही मागणी यावेळी आयोजित मेळाव्यात माकप कार्यकर्त्यांनी केली आहे.
नुकतेच माकप महासचिव सीताराम येचुरी यांच्या दुःखद जाण्याने काॅ.सीताराम यांच्या राजकीय जीवनावर जिल्हा सचिव काॅ.शंकर सिडाम यांनी प्रकाश टाकला,तर शहीद भगतसिंग यांच्या स्वपनातील शोषमुक्त समाज निर्मितीसाठी माकप कटिबद्ध असुन शेतकरी-कामगारांचा हक्काचा लढा तीव्र करत राहण्याचे आवाहन यावेळी माकप नेते किशोर पवार यांनी केले. आगामी राजकीय संघर्षात सातत्याने निरंतर लढा देणाऱ्या लाल बावट्याला राजकीय पर्याय बणविण्यासाठी शेवटाचा माकप कार्यकर्ता भिडला असून निवडणुकीची जोरदार तयारी करण्याचे आवाहण मेळाव्यावे अध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी केले.
यावेळी मंचावर माकप नेत्तुत्व डाॅ.डाखोरे,सुनिता बोनगीर, प्रल्हाद चव्हाण,शैलीया आडे,जनार्दन काळे,खंडेराव कानडे,उपस्थित होते.काॅ.सीताराम अमर रहे,शहीद भगतसिंग अमर रहे,लाल सलामच्या गगणभेदी घोषनांनी यावेळी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.मेळावा यशस्वी करण्यासाठी शेख चाॅद,बाबाभाई कारपेंटर,शे.सलाम,नंदु मोदुकवार, महेमुद पठाण,सुनिल राठोड, मनोज सल्लावार,अडेलु बोनगीर आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शेकडो स्त्री पुरुष कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
मेळ्याव्यात आगामी विधान सभेच्या अनुशंगाने मविआने किनवट मतदार संघ माकपला सोडवे,देवस्थान,वन,गायराण जनिचा लढा तीव्र करा,किनवट जिल्हा, इस्लापुर,मांडवी तालुके करा,पेसा भरती सुरु करुन पेसा कायद्याची अमलंबाजवणी करा,योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा,कापसाला १२ हजार सोयाबणीला ८ हजार हामीभाव जाहीर करा,शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करा या मागण्याचे ठराव एकमतांने पारीत करण्यात आले व या प्रश्नावर जोरदार संघर्ष पेटवण्याचा निर्धार करण्यात आले.