२००९ ला आ. जवळगांवकर यांना ४४ हजाराचे मताधिक्य ; २०२४ आ. कोहळीकर यांना ३० हजारांचे मताधिक्य मिळाले. [ हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघ १९६२ पासूनचा आढावा ] राजकीय विश्लेषण आमचे खास प्रतिनिधी दत्ता शिराणे हिमायतनगर मो. ९४२०५३८९९५ यांनी घेतला तो आम्ही वाचकांसमोर मांडत आहोत.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत अशोक पर्वाच्या आशीर्वादाने तत्कालीन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी ४४ हजार ७८१ मतांची आघाडी घेऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडून गेले होते. त्यांनी शिवसेनेचे बाबुराव उर्फ संभाजीराव गुणाजी कदम कोहळीकर यांचा पराभव केला होता. त्यांना ५१ हजार ८०३ मते पडली होती. आता परवा पार पडलेल्या २०२४ च्या निवडणुकीत आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा पराभव करीत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी इतिहास रचत जवळगावकर यांचा ३० हजार ६५ एवढ्या मताधिक्याने पराभव केला. २००९ च्या निवडणुकीच्या पराभवाचा वचपा आ.कोहळीकरांनी आमदार जवळगांवकराडून काढला आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९६२ ला महाराष्ट्रात विधान सभेची निवडणूक पार पडली. २२४ हदगांव विधान सभा मतदारसंघ या मध्ये मतदारांची संख्या ८२ हजार ५२७ होती. यामध्ये ४८ हजार ४८७ मतदान, तर मतांची टक्केवारी ५८• ७५ ,वैध मते ४४ हजार ६४८ ठरली आहेत. या पहिल्याच निवडणुकीत भा.रा. काॅ. पक्षाचे भिमराव केशवराव हे हदगाव चे पहिले आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांना २१ हजार ७४२ मते मिळाली.तर त्यांचे प्रतिस्पर्धी भा. क.पा. चे नागोराव हणमंतराव हे पराभूत झाले. त्यांना १३ हजार २४६ मते प्राप्त झाली. त्यानंतर १९६७ मतदार होते ९२ हजार २७५ ,मतदान झाले ५४ हजार ९६९ , मतदान टक्केवारी ५९•५७, वैध मते ठरली ५० हजार ९३६, भा. रा. काॅ. चे बी. के. देशमुख २९ हजार ३०८ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भा. क.प.चे व्हि. जी. शिंदे हे पराभूत झाले. त्यांना १५ हजार ८६५ मते मिळाली.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)
त्यानंतर १९७२ ला पुन्हा निवडणूका झाल्या. या मध्ये मतदार संख्या १ लाख ५ हजार १०९ , मतदान झाले ५२ हजार ६६३ , मतांची टक्केवारी ५०•१० , वैध मते ठरली ती ५० हजार ८६९, या निवडणूकीत भा. रा. काॅ. चे पालकर गणपतराव रंगराव हे २९ हजार ५१९ मते घेवून विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भा. क.पा. चे शिंदे विरेंद्र गोविंदराव यांना १६ हजार ४८१ मते मिळाली. यानंतर १९७८ ला अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक ठरली केवळ ६ मतांवर विजय. या वेळेस मतदार होते ९२ हजार ८१२, मतदान झाले ७० हजार ३९५, मतांची टक्केवारी वाढून ७५•९५ इतकी ठरली. वैध मते ७४ हजार २३७ , भा. रा. काॅ. चे शिंदे बापूराव शिवराम यांना मिळालेली मते २९ हजार १०१ ,तर त्यांचे प्रतिस्पर्धी पवार निवृतीराव महादजी ज. पा. पार्टीकडून निवडणूक रिंगणात होते. त्यांना २९ हजार १०७ मते मिळाली. केवळ ६ मतांनी निवृतीराव पवार विजयी झाले.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250103-WA0006.jpg)
त्यानंतर लगेच १९८० ला निवडणूक झाली. मतदार संख्या होती १ लाख १२ हजार ६६९, मतदान ७३ हजार २९६ झाले, मतांची टक्केवारी घटून ६५•०५ ठरली. तर वैध मते ८१ हजार ६९४ तर या निवडणूकीत भा. रा. काॅ. ( आय ) पक्षाच्या पाटील सूर्यकांता जयवंतराव ह्या ३४ हजार ७७३ मते घेवून विजयी झाल्या तर त्यांचे प्रतिस्पर्धी भा. रा. काॅ. ( यु. ) पक्षाचे शिंदे बापूराव शिवराम पाटील यांना ३४ हजार १९६ मते प्राप्त झाली. बापूराव पाटील यांचा केवळ ५१७ मतांनी पराभव झाला. त्यानंतर १९ ८५ ला मतांची टक्केवारी ६४•९४ अशी राहीली. मतदार संख्या १ लाख ३१ हजार १५९ , मतदान झाले ८५ हजार १७१ ,तर ठरलेली वैध मते ८३ हजार ५०७, या निवडणूकीत भा.काॅ. एस. पक्षाचे बापूराव पाटील आष्टीकर हे ४६ हजार ३६५ मते घेवून विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भा. रा. काॅ. पक्षाचे देशमुख विनायकराव रामराव यांना ३० हजार ८७३ मते मिळाली. यानंतर १९९० ला मतदार संख्या १ लाख ५२ हजार ८८१, मतदान १ लाख ४ हजार २४७ , मतांची टक्केवारी ६८•१९, वैध मते १ लाख १ हजार ७३२, या निवडणूकीत भा. रा. काॅ. चे आष्टीकर बापूराव शिवराम पाटील हे ३१ हजार ७३९ मते घेवून विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार देशमुख पंडितराव नारायणराव भाजपकडून लढले. त्यांना २५ हजार ४४९ मते मिळाली. भारिपकडून लढलेल्या राठोड गणेश सिताराम यांनाही १८ हजार ९३६ लक्षवेधी मते मिळाली.
यानंतर १९९५ ला शिवसेनेचा उदय झाला. या वेळेस मतदार संख्या १ लाख ६६ हजार ६८४, झालेले मतदान १ लाख ३२ हजार ३००, मतदान टक्केवारी ७९•३७ , वैध ठरलेली मते १ लाख २९ हजार ५८, या निवडणूकीत शिवसेनेचे वानखेडे सुभाष बापूराव ३१ हजार ४७८ मते घेवून विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष पवार बाबुराव यादवराव यांना २४ हजार ८४२, बि. बी. एम. एस. पक्षाचे शेख जकीर शेख मोहम्मद यांना २४ हजार ७६५ मते मिळाली व तसेच भा.रा. काॅ. पक्षाचे पाटील बापूराव शिवराम यांना २० हजार २५२ मते मिळाली. ज. द. पक्षाकडून उभे असलेले शक्करगे लक्ष्मणराव गिरजप्पा यांना १४ हजार ४८५ मते प्राप्त झाली होती. १९९९ ला परत शिवसेनेने बाजी मारली. मतदार संख्या १ लाख ६८ हजार ६९९, मतदान झाले १ लाख १६ हजार १६४ , मतदान टक्केवारी ६८•८६ वैध मते ठरली १ लाख ३ हजार ९९५, शिवसेनेचे सुभाष बापूराव वानखेडे हे ३६ हजार ४८६ मते घेवून विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भा. रा. काॅ. पक्षाचे आष्टीकर बापूराव पाटील यांना ३३ हजार ८७४ मते प्राप्त झाली. व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबुराव यादवराव पवार यांना ही २७ हजार ४ मते मिळाली.
२००४ ला पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला. मतदार संख्या वाढून २ लाख ३ हजार ८९२, मतदान झाले १ लाख ५० हजार ६३२,मतदान टक्केवारी ७३•८८ , वैध ठरलेली मते १ लाख ५० हजार ६२२, या निवडणूकीत ही वानखेडे सुभाष बापूराव शिवसेना पक्ष ५१ हजार ८४२ मते घेवून विजयी झाले, तर इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे पवार माधवराव निवृतीराव यांना ४८ हजार १०४ मते मिळाली. तसेच भारिप बहुजन महासंघाचे चाभरकर गंगाधर बिभीषण यांना २७ हजार ९९६ ,तर अपक्ष लढलेले पाटील बापूराव शिवराम यांना १५ हजार ८७३ मिळाली होती. सन २००९ ला आताचे २०२४ चे दोन्ही उमेदवार आमने आमने होते. मतदार संख्या २ लाख ३१ हजार २७५,मतदान झाले १ लाख ६१ हजार ९००, मतदान टक्केवारी ७०% , १ लाख ६१ हजार ९२७ मते वैध ठरली. भा. रा. काॅ. पक्षाकडून पवार माधवराव निवृतीराव हे ९६ हजार ५८४ मते घेवून विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी बाबुराव उर्फ संभाराव गुणाजी कदम पक्ष शिवसेना यांना ५१ हजार ८०३ मते मिळाली. पुन्हा २०१४ ला हदगावची जागा शिवसेनेने काबीज केली.
मतदार संख्या २ लाख ६६ हजार ५३४, मतदान झाले १ लाख ८७ हजार ५०३, मतदान टक्केवारी ७०•३५, वैध ठरलेली मते १ लाख ८६ हजार २८१, या मध्ये शिवसेनेचे आष्टीकर पाटील नागेश बापूराव हे ७८ हजार ५२० मते मिळवून विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे जवळगावकर माधवराव निवृतीराव पवार पाटील यांना ६५ हजार ७९ मतं मिळाली. भारिप बहुजन महासंघाचे डाॅ. बळीराम विश्वनाथ भुरके यांना २२ हजार ९०४ मते मिळाली. यानंतर २०१९ ला इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे जवळगावकर माधवराव निवृतीराव पवार पाटील हे ७४ हजार ३२५ मते घेवून विजयी झाले. तर अपक्ष बाबुराव उर्फ संभाराव कोहळीकर यांना ६० हजार ९६२ मते प्राप्त झाली. तर शिवसेनेचे आष्टीकर नागेश बापूराव पाटील यांना ४४ हजार १४३ मते मिळाली.
तर २०२४ ला पार पडलेल्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गट भाजप व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार बाबुराव उर्फ संभाजीराव कदम कोहळीकर तर काँग्रेस शिवसेना उबाठा गट व इतर मित्र महाविकास आघाडीकडून आमदार माधवराव निवृतीराव पवार पाटील जवळगावकर हे निवडणूक रिंगणात होते. त्यांचा या निवडणूकीत पराभव झाला. महायुतीचे कोहळीकर हे ३० हजार ६५ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. २००९ ला पार पडलेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा कोहळीकर यांनी २०२४ च्या निवडणुकीत काढला. हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात पुरूष १ लाख ५४ हजार ८९२, इतकी संख्या आहे. तर महिला १ लाख ४४ हजार १९०, तृतीय पंथी ४ अशी एकूण २ लाख ९९ हजार ८६ मतदार संख्या आहे.