नांदेड| उपविभाग पोलीस अधिकारी कार्यालय इतवारा गुन्हे शोध पथकाने महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला 1,90,900/-रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून, या कार्यवाहीमुळे गुटखा माफियाट खळबळ उडाली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैध धंदयाची माहीती काढुन अवैद्य धंदे करणारे लोकांविरुध्द विरुध्द कारवाई करणे बाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनंषगाने दिनांक 04/01/2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील गुन्हे शोध पथकाचे पो. स्टे. इतवारा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी नामे शेख तरबेज शेख जावेद वय 28 वर्षे रा. नई मस्जीत जवळ हतई इतवारा नांदेड हा महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा त्याचे राहते घरामध्ये बाळगुन आहे. त्यावरुन सदर ठिकाणी छापा टाकून कार्यवाही करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
या कार्यवाहीत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इतवारा गुन्हे शोध पथकाने सुगंधीत जर्दा 500 ग्राम चे पॉकेट किमती 109,600/- रुपये, राजनिवास सुगंधीत गुटखा किंमती 28,800/- रुपये, विमल सुगंधीत गुटखा – किंमती 36,000/- रुपये, ZL-01 कंपणीचा जाफराणी जर्दा किंमती 7,200/- रुपये, V-1 कंपणीचा जर्दा किंमती 9,000/- रुपये असा एकूण किंमती 1,90,900/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील गुन्हे शोध पथकाचे पोना अर्जुन मुंडे, पोकों श्रीराम दासरे, नेमणुक पो. स्टे नांदेड ग्रामीण सलग्न उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इतवारा, मपोकों मैशरबी शेख नेमणुक पोलीस स्टेशन इतवारा तपास परि, पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे पो. स्टे. इतवारा हे करीत आहेत.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)