हिमायतनगर| शहरातील जनता कॉलनी भागातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी घरातील कपाटातील नगदी रक्कम चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या चार-पाच दिवसापासून थंडीचा कडाका सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी हिमायतनगर शहरातील जनता कॉलनी परिसरात चोरट्यांनी बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून नगदी रक्कम सतरा हजार पाचशे रुपये चोरून नेले आहेत. याबाबत विलास लक्ष्मण शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दिनांक दोन ते तीनच्या मध्यरात्रीला घडली असून, शहरात पुन्हा चोरटे सक्रिय झाले असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्र गस्त वाढूं शहरात्त चोरीच्या घटना घडणार नाहीत याकडे लक्ष देऊन जनता कॉलनी भागातील चोरीच्या घटनेच्या आरोपीचा शोध लावावा अशी मागणी केली जात आहे.