HomeनांदेडMla. Srijaya Chavan : भाजप सदस्य नोंदणीसाठी भोकर विधानसभेत आजपासून विशेष मोहीम...

Mla. Srijaya Chavan : भाजप सदस्य नोंदणीसाठी भोकर विधानसभेत आजपासून विशेष मोहीम – आ. श्रीजया चव्हाण यांचा उपक्रम -NNL

नांदेड| भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया चव्हाण भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठी रविवारपासून आपल्या मतदारसंघात दिनांक ५ ते ११ जानेवारी दरम्यान विशेष जनसंपर्क मोहीम राबवणार आहेत.

सध्या देशभरात भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी सुरु आहे. भोकर विधानसभा मतदारसंघात भाजप सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गती देण्यासाठी आ. श्रीजया चव्हाण यांनी ५ ते ११ जानेवारी दरम्यान विशेष जनसंपर्क मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेंतर्गत रविवारी ५ जानेवारीला भोकर, अर्धापूर, मुदखेड, मालेगाव, भोकर फाटा व बारड, ६ जानेवारीला कोंढा, ७ जानेवारीला भोसी, ८ जानेवारीला कामठा बु., ९ जानेवारीला भोकर व मालेगाव, १० जानेवारीला अर्धापूर तर ११ जानेवारीला लहान, पाळज, बारड येथे विशेष कक्ष उभारून भाजपची सदस्य नोंदणी केली जाणार आहे.

७ ते १० जानेवारी दरम्यान आ.श्रीजया चव्हाण यांच्या उपस्थितीत भोकर विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यात बैठकी व नोंदणीचे कार्यक्रम होणार आहे. या मोहिमेत भाजपच्या विविध प्रकोष्ठ मार्फतही सदस्य नोंदणी अभियान राबवले जाईल. नागरिकांनी मोठया संख्येने ८८००००२०२४ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य व्हावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला आपले समर्थन द्यावे, असे आवाहन आ. श्रीजया चव्हाण यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments