नांदेड। ररेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी संक्रांती सणानिमित्त विशेष गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे. याचा सर्व प्रवाश्यानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने संक्रांतीच्या सणानिमित्त प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीला सामोरे जाण्यासाठी विशेष गाड्यांचे आयोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 07487/07488 नांदेड-काकिनाडा-नांदेड विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक 07487 (नांदेड-काकिनाडा): दिनांक: 06 जानेवारी आणि 13 जानेवारी (सोमवार), 2025 वेळ: दुपारी 02.25 वाजता नांदेड येथून सुटेल. मुख्य थांबे: मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, सिकंदराबाद, वारंगल, रायानपडू, राजमुंद्री, आणि सामलकोट. काकिनाडा येथे पोहोचण्याची वेळ: सकाळी 08.10 वाजता (मंगळवार). गाडी क्रमांक 07488 (काकिनाडा -नांदेड): दिनांक: 07 जानेवारी आणि 14 जानेवारी (मंगळवार), 2025 वेळ: सायंकाळी 18.10 वाजता काकिनाडा येथून सुटेल.
मुख्य थांबे: सामलकोट, राजमुंद्री, रायानपडू वारंगल, सिकंदराबाद, निजामाबाद, बासर धर्माबाद, आणि मुदखेड. नांदेड येथे पोहोचण्याची वेळ: दुपारी 03.10 (बुधवार). या गाडीत एकूण 22 डब्बे असतील ज्यात जनरल, स्लीपर, वातानुकुलीत डब्यांचा समावेश आहे. प्रवाशांसाठी सूचना: प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा नजीकच्या आरक्षण केंद्रावरून तिकीट आरक्षण करावे. तसेच, प्रवासा दरम्यान सुरक्षितता आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.