लोहा| लोह्याच्या माजी नगराध्यक्षा जिजाबाई व्यंकटराव मुकदम यांचे वृद्धोपकाळात निधन झाले.नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी लोह्यात मुकदम याच्या निवासस्थानी भेट दिली व कुटुंबियांचे सांत्वन केले.
लोह्याचे चव्हाण- मुकदम व नायगावचे चव्हाण या दोन्ही कुटुंबियांचे नाते संबंध आहेत. खासदर रवींद्र चव्हाण यांनी मातोश्री जिजाबाई मुकदम याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कुटूबीयांचे सांत्वन केले माजी सभापती व्यंकटराव मुकदम याचा जुन्या आठवणींना तसेच कौटुंबिक नातेसंबंधास उजाळा दिला .यावेळी माणिकराव मुकदम नारायणराव मुकदम,केशवराव मुकदम, माधवराव मुकदम, डॉ दिनेश चव्हाण, प्रा डॉ डि एम पवार, सचिन चव्हाण ,बिपीन चव्हाण व कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते.
खा.रविंद चव्हाण यांच्या सोबत काँग्रेसचे जेष्ठ अनिल मोरे, श्रीनिवास मोरे, माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे, रंगनाथ भुजबळ, शिवाजी आंबेकर, दता दिघे, मधुकर दिघे, कैलास मोरे, हरिभाऊ चव्हाण, दिनेश तेललवार, संजय मक्तेदार, हरिहर धुतमल यासह मान्यवर उपस्थित होते. सकाळीच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही मुकदम कुटुंबीयांची भेट घेतली ,आमदार आनंदराव पाटील बोढारकर, प्राणिताताई देवरे चिखलीकर , मुदखेड चे तहसीलदार आनंद देऊळगावकर , यासह अनेक आप्तस्वकीय यांनी मुकदम-चव्हाण परिवाराचे घरी जाऊन सांत्वन केले.