हिमायतनगर,अनिल मादसवार। शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, या ठिकाणी ग्रामीण भागातुन मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थिनी व महाविद्यालयीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी हिमायतनगर शहरांमध्ये ये-जा करतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये रोड रोमओंची संख्या जास्त होऊ लागल्याने, ते मुलींचा पाठलाग करणे, मूलींना पाहून अश्लील चाळे करणे, एकमेकांना अश्नील शिव्या देणे, मुलींच्या समोर एकत्र जमून गोंधळ घालून, अश्नील व्यवहार करणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत.
तालुक्याच्या ठिकाणी आठवडी बाजार हा बुधवारी असतो. त्या भरणाऱ्या आठवडी बाजारातुन मोठमोठ्याने हॉर्न वाजवत दुचाकी सुसाट वेगाने पळवणे, खेड्यातील बाजार करण्यासाठी आलेल्या महिलांना व इतरांना घाबरवणे, जाणीवपूर्वक महिलांना धक्के देणे असे कृत्य टवाळखोरांकडून चालू आहेत. त्यामुळे महिला मुली या रोडरोमिओंच्या त्रासाला वैतागून गेले असून, या प्रकारामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाला मोठे महत्त्व असल्याने मुलींना शिकवणी, शाळा, कॉलेजमध्ये पाठविण्यासाठी पालक वर्ग विवंचनेत पडले. यामुळे मुलींच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे शासन प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.
अश्या रिकामटेकडे रोडरोमिओंच्या त्रासापासून महिला मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन त्यांना अद्दल घडवीण्यासाठी हिमायतनगर शहरातील बसस्थानक परिसर, हुतात्मा जयवंतराव पाटील कॉलेज, राजा भगीरथ विद्यालय, रेल्वे स्टेशन सह शहर परिसरामध्ये मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथकाची नेमणुक करून, मुलींची सुरक्षा सुनिश्चित करावी असेही देण्यात पोलीस अधीक्षक नांदेड यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, हिमायतनगर व पत्रकार बांधवांना देण्यात आली आहे. या निवेदनावर मुन्ना उर्फ माधव किशन शिंदे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षरी आहे.