हदगाव। श्री श्री रविशंकरजी प्रणीत आर्ट ऑफ लिव्हिंग नांदेड तर्फै कौठा येथे शिव पार्वती मंगल कार्यालय मध्ये दि.20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान ग्रामीण अनुभुती शिबिर आनंद व उत्साहात आज संपन्न झाले ज्या साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यांनी अनुभव व अनुभुती पण छान सांगितली.
आरोग्य व अध्यात्मिक प्रगती बद्दल सांगत असतांना सुदर्शन क्रिया अतिशय गुणकारी आहे जिवनात श्वास किती महत्वाचे आहेत व श्वासावर नियंत्रण असल्यास आपल्या जिवनात किती आमुलाग्र बदल होतो व जिवन आनंदमय होऊन जाते असे अनेक साधकांनी आपले अनुभव सांगितले .
पुढील आनंद अनुभुती शिबिर हे 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या दरम्यान शिव पार्वती मंगल कार्यालय कौठा येथे सकाळी 5.30 ते 8.30 या वेळात होणार आहे व हे शिबिर सहा दिवसाचे आहे या शिबिरास उपस्थित राहण्यासाठी पूर्व नोदंणी आवश्यक आहे व वयोमर्यादा 18 + आहे.
तरी जास्तीत जास्त संख्येने पुढील होणा-या शिबिरा रजिस्ट्रेशन करुन आपली शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक प्रगती करुन घ्यावी असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक तथा सुप्रसिद्ध भागवताचार्य व रामायणाचार्य ज्ञानेश भक्त महेश महाराज शेवाळकर व हदगांव आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व टीमने केले आहे.