HomeलातूरAnil waghmare ; डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा...

Anil waghmare ; डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव -NNL

बीड। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर संपादक अनिल वाघमारे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्य भरातील स्नेही मित्र तसेच सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक तसेच प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार स्नेही मित्रांचे संपादक अनिल वाघमारे यांनी आभार व्यक्त केले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी पुण्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद राज्यस्तरीय कार्यशाळेच्या कार्यक्रम दरम्यान बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा डोंगरचा राजाचे संपादक अनिल वाघमारे यांची मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती जाहीर केली.

संपादक अनिल वाघमारे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवडी संदर्भात घोषणा होताच सभागृहात उपस्थित पत्रकारांनी या निवडीचे स्वागत करत टाळ्यांचा गजर करत त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून संपादक अनिल वाघमारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बीड जिल्ह्यांत विविध ठिकाणी त्यांचा यथोचित सत्कार करुन अनेकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. संपादक अनिल वाघमारे यांनी राज्य भरातील स्नेही मित्र तसेच सर्व राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार स्नेही मित्रांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोबाईल फोन वरून शुभेच्छा दिल्या असल्याने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments