भोकर l महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय भोकर व कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी व आत्मा भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील कृषी विभागाचे आदर्श गाव मौजे नागापूर येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादन वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम योजना सन 2024-25 अंतर्गत सोयाबीन पिकाची शेतीशाळेतील शेतीदिन व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


शेतीदिन व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण( पूजन )करून सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी येथील विद्यमान सरपंच श्री.मा.दत्ता व्यवहारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री मा.भाऊसाहेब बराटे हे होते. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, प्रा.माणिकराव कल्याणकर प्रा.संदीप जायभाये, डॉ.महेश आंबोरे व भोकर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव साहेब व भोकर मंडळ कृषी अधिकारी रामहरी मिसाळ हे होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक दिलीप काकडे यांनी केले तर प्रस्तावित तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले. कृषी दिन कार्यक्रमात प्रथमतः यावेळी भाऊसाहेब बराटे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.देविकांत देशमुख प्रा.माणिकराव कल्याणकर,डॉ.महेश आंबोरे प्रा.संदीप जायभाये यांनी सोयाबीन कापूस,तुर,हळद, सर्व भाजीपाला पिका विषय व रब्बी हंगामातील हरभरा व गहू पिकाच्या वाण निवड तसेच पिकाच्या एकात्मिक अन्नद्रव्य खत व्यवस्थापन, एकात्मिकता तन व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन बद्दल सविस्तर मार्गदर्शक केले.

तसेच नॅडप/वर्मी कंपोस्ट तयार करणे,निंबोळी अर्क 5% तयार करणे ची प्रात्यक्षिक व दशपर्णी अर्क, बिजामृत,जीवामृत तयार करण्याच्या पद्धती विषयी सखोल असे मार्गदर्शन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आत्मअंतर्गत नैसर्गिक शेतीचे गट तयार करणे या विषय मार्गदर्शन करून नागापूर ग्रामपंचायत कार्यालय यांना कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी मार्फत गांडूळ युनिट च्या स्ट्रक्चर चे भेट येथील सरपंच श्री दत्ता व्यवहारे यांना ग्रामपंचायत कार्यालयासाठी दिले.
कार्यक्रमातील अध्यक्षीय समारोप भाषणात सरपंच दत्ता व्यवहारे यांनी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व आत्मा भोकर व KVK पोखर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या नागापुर गावामध्ये कृषी विभागाचा कृषीदिन कार्यक्रम व शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम हा येथील कर्तव्यदक्ष व आदर्श कृषी सहाय्यक डदिलीप काकडे, आत्मा भोकर येथील आनंद बोईनवाड,सुदर्शन घुमनवाड यांनी सुनियोजित पणे नागापूर येथे सोयाबीन पिकाची शेतीशाळेचा शेतीदिन व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध केल्याबद्दल व नांदेड जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील सर्व वरिष्ठ शास्त्रज्ञ इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी एकाच मंचावर उपस्थित झाले होते.
नागापुर गावामध्ये प्रथमच येऊन ग्राम स्तरावर कृषी विभागाच्या KVK च्या विविध योजना विषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केल्याबद्दल येथील सरपंच दत्ता व्यवहारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कृषी विभागाचे व कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी यांचे आभार व्यक्त करून आभार व्यक्त करून ग्वाही दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी भोकर श्री राम हरी मिसाळ यांनी केले.
यावेळी येथील कृषी पर्यवेक्षक रवीकुमार तांडे , येथील उपसरपंच तथा भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापती बालाजी गंगाधर शानमवाड,पोलीस पाटील बालाजी शंकर शानमवाड, ग्रा.प.सदस्य मारुती पोशटी बेरदेवाड, सुरेश गुजेवाड,मा.सरपंच बालाजी ऊल्लेवाड,तंटामुक्त अध्यक्ष,चेअरमन व हनुमान मंदिराचे अध्यक्ष तथा शेतीशाळेचे होस्ट फार्मर गोविंद संतराम गुजेवाड,बापुराव पाटील,जगन्नाथ पाटील शाणमवाड ,बालाजी पाटील कदम,ग्रा.प.सेवक रामु गाडेकर,शंकर गाडेकर यांच्यासह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व शेतीशाळेत निवड केलेले सर्व शेतकरी बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.